mediator kill during settle the quarrel esakal
नाशिक

नाशिक : दोघांचे भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : समजूतदारपणा व इतरांना समजवून सांगण्याचा मोठेपणा कधी कधी अंगलट येतो, याचा प्रत्यय येवल्यातील घटनेत आला. उत्तर प्रदेशातील येथे स्थायिक असलेल्या दोन अननस विक्रेत्यांच्या वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या रस विक्रेत्याचा रागाच्या भरात एकाने चाकूने वार करून खून केला.

मध्यस्ती बेतली जिवावर

खून झालेल्या व्यक्तीचा शालक मनोजकुमार राजकुमार कुशवाह यांच्या फिर्यादीवरून अननस विक्रेत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणातील मृत व संशयित आरोपी परप्रांतीय आहेत. फिर्यादी मनोज राजकुमार कुशवाह (वय ३०, धंदा- पोगें विक्री, रा. बिरमपूर, ता. तिरवा, जि. कन्नोज, उत्तर प्रदेश, ह. मु. बुंदेलपुरा, येवला) याने फिर्यादीत म्हटले आहे, की शहरात दहा वर्षांपासून बहीण सीमा व तिचे पती मनोजकुमार प्रभुदयाल कुशवाह यांच्या सोबत राहत आहे. तसेच गावाकडीलही इतर मुलेही शहर परिसरात अननस विक्रीचा व्यवसाय करतात. गुरुवारी (ता. ३०) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. मनोजकुमार प्रभुदयाल कुशवाह (रा. मल्लपूर्वा, ता. गलालाबाद, जि. कन्नोज, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव असून, ते उसाचा रस विक्रीचा व्यवसाय करायचे. त्यांच्या ओळखीने गावाकडीलही इतर काही मुले येवल्यात आली असून, ते अननस विक्री करतात. त्यापैकी एक ब्रिजेशकुमार रामशंकर कुशवाह, (रा. भवानीपूर, ता. तिरवा, जि. कन्नोज, उत्तर प्रदेश) याने त्याचा साथीदार गुलाबसिंग याचे अननस खाल्याने दोघांचा वाद झाला. हा वाद मिटविण्यासाठी मनोजकुमारने दोघांची समजूत काढली. परंतु ब्रिजेशकुमार ऐकत नसल्याने मनोजकुमारने त्यास चापटी मारून तेथून हाकलले.

तो तेथून रागात निघून गेला. त्यानंतर काही वेळात ब्रिजेशकुमार पुन्हा घराबाहेर आला व त्याने रागाच्या भरात मनोजकुमार यांची गच्ची धरली व चाकूने डोक्याच्यामागे वार केला. त्यानंतर ब्रिजेशकुमार लगेच तेथून पळून गेला. जखमी मनोजकुमारला येवला व कोपरगाव येथील दवाखाण्यात नेले. तेथून पुन्हा मनोजकुमार यांना येवला ग्रामीण रुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मनोजकुमार मृत झाल्याचे सांगितले.
शहर पोलिसांनी आरोपी ब्रिजेशकुमार कुशवाह याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र ब्रिजेशकुमार फरारी आहे. मनमाड उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंग साळवे यांनीही घटनास्थळी भेट दिली असून, आरोपींचा शोध पोलिस घेत असल्याचे निरीक्षक भगवान मथुरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAE Visa Services: भारतीय प्रवाशांना अलर्ट! UAE मध्ये पासपोर्ट आणि व्हिसा सेवा बंद राहणार; जाणून घ्या नेमके कारण

Pune Grand Tour 2027 : पुणे ग्रँड टूर २०२७ अंतर्गत भोर–राजगड–मुळशीतील १७ रस्त्यांसाठी १९७ कोटींची मंजुरी; १३० किमी रस्ते डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार

Latest Marathi Live Updates: काँग्रेसचे खासदार राहुल गांधी मुंबई विमानतळावर दाखल

विहिरीत उतरल्यावर समोर आली भूतकाळातील धक्कादायक रहस्ये! पाहा कसा आहे 'घबाड-कुंड' चित्रपट?

Mumbai Electricity: मुंबईत रिंग नेटवर्क उभारणार, १५ हजार कोटींचा खर्च; वीजपुरवठ्यासाठी टाटा पॉवरचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT