31 posts vacant in five Primary Health Centre solapur corona govt
31 posts vacant in five Primary Health Centre solapur corona govt esakal
नाशिक

Nashik News : धारगाव आरोग्यकेंद्र असून नसल्यासारखे; आदिवासी भागातील रूग्णांची गैरसोय

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : इगतपुरी तालुक्यातील धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अनागोंदी कारभारामुळे रूग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत. (medical officers and staff of health center is not present on duty in Health Center nashik news)

आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने रुग्णांना घोटी, खोडाळा येथे खासगी किंवा शासकीय रुग्णालयात जावे लागते. आरोग्य केंद्रातील कर्मचारी मुख्यालयात रहात नाही. कर्मचाऱ्यांनी कामाच्यावेळी तरी उपस्थित रहावे अशी मागणी आदिवासी जनतेने केली आहे.

इगतपुरी तालुक्यातील धारगाव (वैतरणा) हे आदिवासी अतिदुर्गम भागातील महत्त्वाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र या आरोग्य केंद्रात वैद्यकीय आधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी कारभारामुळे रूग्णसेवा पुरेशी मिळत नाही. अनेकदा कुणीही नसल्याने रूग्णांना तासनतास थांबावे लागते. यात एखादा अत्यवस्थ रूग्ण असेल तर त्यावर प्रथमोपचारही होत नाही.

आदिवासी अतिदुर्गम भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी यासाठी शासन इमारतीसह कर्मचारी वेतनासाठी व सुख सुविधांवर कोटयावधी रुपयांचा खर्च करीत आहे. वैद्यकीय आधिकारी व कर्मचारींचे मात्र कर्तव्य बजावण्याकडे दुर्लक्षच होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

या प्राथमिक केंद्रात कर्मचारी वैद्यकीय आधिकारी निवासी कधीही नसतात. सर्वच जण नाशिक, घोटी आदी शहरातून ये- जा करतात. रात्री तर हे केंद्र चक्क बंदच असते. त्यामुळे रात्री रूग्णांवर उपचारच होत नाही.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

रात्रीच्या वेळी आणीबाणीच्या रूग्णासाठी हे वैद्यकीय केंद्र कुचकामी ठरत आहे. जलद उपचारासाठी पंचवीस ते तीस किमीवरील घोटी वा खोडाळा येथे खाजगी किवा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी धावपळ करावे लागते, यात तातडीने सुधारणा करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नवनाथ गायकर यांनी केली आहे.

"धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार रामभरोसे सुरू आहे. दोन वैद्यकीय आधिकारी असताना आरोग्य केंद्रात निवासी कुणीच नसते. कधी कधी केंद्र केवळ शिपायांच्या भरवशावर टाकले जाते. पारिचारिकेच्या रूग्ण उपचारास मर्यादा आहे. तरीही परिचारिका करून अवघड कामे करुन घेतले जातात. हा रामभरोसे कारभार थांबणार कधी?" - गोविंद पुंजारा, माजी सरपंच, धारगाव.

उत्तम आरोग्य सेवा पुरवा.

इगतपुरी तालुका हा आदिवासी अतिदुर्गम तालुका आहे. शासन येथे उत्तम आरोग्य सेवा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहे. मात्र आधिकारी व कर्मचारी हलगर्जीपणा करतात. हा हलगर्जी पणा थांबवा व उत्तम आरोग्य सेवा पुरवा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा माजी जि.प. सदस्य गोरख बोडके यांनी दिला आहे.

निवासी न राहणाऱ्या वर कारवाईची मागणी

"आदिवासी भत्ता, घरभाडे भत्ता आदिसह भरभक्कम वेतन घेणारे कर्मचारी व आधिकारी धारगाव परिसरात निवासी रहात नाही. या आधिकारी व कर्मचार्यानां प्रशासन व लोकप्रतिनिधीच पाठिशी घालत असतात.मग गोर गरिब आदिवासी बांधवाचे वाली कोण?"-नवनाथ गायकर सामाजीक कार्यकर्ते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT