नाशिक

प्रलंबित वैद्यकीय देयके दिवाळीपूर्वी अदा करणार

CD
NSK26H33792 जळगाव : जिल्ह्यातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वैद्यकीय देयकांबाबत शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांना निवेदन देताना समन्वय समितीचे पदाधिकारी- सदस्य. ------ प्रलंबित वैद्यकीय देयके दिवाळीपूर्वी करणार अदा उपशीर्षक शिक्षणाधिकाऱ्यांची ग्वाही; शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २८ : जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली वैद्यकीय देयके दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावीत, या मागणीसाठी माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर संघटना समन्वय समिती, जळगाव जिल्ह्याच्या वतीने शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. कल्पना चव्हाण यांनी प्रलंबित वैद्यकीय देयकांबाबत गांभीर्याने दखल घेत वेतन पथक अधीक्षकांना दिवाळीपूर्वी वैद्यकीय देयके अदा करण्यासंदर्भात तातडीच्या सूचना दिल्या. त्यानंतर समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वेतन पथक अधीक्षक दिलीप पवार यांची भेट घेऊन प्रलंबित वैद्यकीय देयकांचा प्रश्न मांडला. श्री. पवार यांनी सकारात्मक भूमिका घेत वेतन पथक कार्यालयामार्फत वैद्यकीय देयके दिवाळीपूर्वी अदा करण्याबाबत आश्वासन दिले. या प्रसंगी समन्वय समितीचे समन्वयक तुळशीराम सोनवणे, मार्गदर्शक डॉ. मिलिंद बागूल, पी. एस. सोनवणे, अध्यक्ष गिरीश नेमाडे, कार्याध्यक्ष पी. ए. पाटील, उपाध्यक्ष गोविंदा पाटील, महिला प्रतिनिधी सुनीता पाटील, शिक्षक सेना महिला जिल्हाध्यक्ष सुनीता खडके, डीएड महासंघाचे विभागीय अध्यक्ष भास्करराव बागल, कार्यकारिणी सदस्य संतोष कचरे, प्रेम झंवर, स्वप्निल पाटील, महेंद्र पवार, शशिकांत राणे राजपूत, झोपे (अमोदा), रंजीत सुरवाडे यांच्यासह अनेक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: भारतीय महिला संघाची विजयी हॅटट्रिक! ५ विकेट्स घेऊन झिम्बाब्वेचे कंबरडे मोडणारी Vaishnavi Sharma कोण?

Raj Thackeray Karjat tree cutting visit : "गुजरातमधल्या एका कंपनीसाठी हा सारा खटाटोप!"; कर्जतच्या जंगलात स्वतः उतरताच राज ठाकरेंचा सरकारवर थेट वार, सभेत तोफ धडाडणार!

Marathi News Live Updates : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत विजयाची आघाडी मिळताच राष्ट्रवादी शरद पवार गटाचा धाराशिवमध्ये जोरदार जल्लोष!

Numerology: करिअरमध्ये मोठी रिस्क घ्यायला घाबरत नाहीत 'या' मूलांकाचे लोक; नवीन स्किल्स शिकण्यात असतात नंबर वन!

WPL 2027 Auction: सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील 'किरण' DCच्या ताफ्यात; मुंबई इंडियन्सकडून जोरदार प्रयत्न, पण.. कोण आहे Kiran Navgire?

SCROLL FOR NEXT