election  sakal
नाशिक

नाशिक :पन्नास लोकांत सभा, पाच लोकांत प्रचार

मनपा, जि.प.साठी निवडणूक आयोगाच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिका निवडणुकांबाबत शासन पातळीवर अद्याप अनिश्‍चितता असताना, राज्य निवडणूक आयोगाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निवडणुकीसाठी कोरोना आचारसंहिता लागू केली आहे. यात दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच मतदान करता येणार आहे, तर ४८ तासांच्या आत आरटीपीसीआर चाचणी व निगेतटिव्ह अहवाल असेल, तर अशाच व्यक्तींना मतदान व मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रचारसभांना ५० व्यक्तींच्या उपस्थितीचे बंधन घातले आहे.

या वर्षात राज्यातील २२ महापालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी पात्र ठरणार आहे. महापालिकेबरोबरच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्याही निवडणुका होतील. मात्र, निवडणुकांवर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. निवडणूक प्रक्रियेत भाग घेणाऱ्या व्यक्तींसाठी या सूचनांचा पालन करणे बंधनकारक आहे. निवडणुकीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क, सामाजिक अंतराचे पालन, सॅनिटायझेशन बंधनकारक असेल. निवडणुकीसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी, मतदान व मतमोजणी प्रतिनिधीनाच मतदान व मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. मतदान प्रक्रियेच्या ठिकाणी तपमान यंत्राद्वारे तपासणी होईल. या सर्व बाबींवर नोडल अधिकारी नजर ठेवणार आहेत.

प्रतिबंधित क्षेत्रातील कोरोनाबाधित मतदारांचे शरीराचे तपमान दोनदा तपासले जाणार आहे. विहीत निकषांपेक्षा अधिक तापमान आढळल्यास मतदानाची वेळ संपण्याच्या एक तासापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून मतदानाची मुभा दिली जाणार आहे. प्रचार सभेसाठी फक्त ५० व्यक्तींनाच परवानगी दिली जाणार आहे. घरोघरी प्रचार करताना पाचपेक्षा अधिक व्यक्तींना फिरता येणार नाही. रोड शोसाठी दहा वाहनांना परवानगी असेल. दोन काफिल्यांमध्ये अर्ध्या तासाचे अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

निवडणूक आयोगाच्या इतर मार्गदर्शक सूचना

  • एका मतदान केंद्रात ७०० ते ८०० मतदार

  • दोन मतदारांमध्ये सहा फुटाचे अंतर

  • मतदान, मतमोजणी केंद्राचे सॅनिटायझेशन

  • मतदान केंद्रांवर मतदारांचे थर्मल स्कॅनिंग

  • तपासणीनंतरच मतदानाचे टोकन

  • निवडणूक कर्मचाऱ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण

  • मतदान केंद्रांवर सॅनिटायझरची व्यवस्था

  • पोस्टल बॅलेटची स्वतंत्र सभागृहात मोजणी

  • मतमोजणी वेगवेगळ्या सभागृहात घेण्याची मुभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT