नाशिक

मेहुणबारे पोलिसांची वाळूचोरीविरुद्ध कारवाई

CD
मेहुणबारे पोलिसांची वाळूचोरीविरुद्ध कारवाई डंपरसह एक ब्रास वाळू जप्त; एकाविरुद्ध गुन्हा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३० : नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी मेहुणबारे पोलिसांनी कारवाई केली. कळमडू गावातील कुंभार रोड परिसरात विनापरवाना वाळू वाहतूक करणारा डंपर पोलिसांनी पकडला. या कारवाईत डंपरसह एक ब्रास वाळू असा एकूण १४ लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी महेश दिनकर सूर्यवंशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळमडू गावातील कुंभार रोड परिसरात गुरुवारी (ता. २९) अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता, महेश दिनकर सूर्यवंशी हा कोणताही वैध पास किंवा परवाना नसताना शासनाच्या मालकीची गौण खनिज वाळू डंपरमधून वाहतूक करताना आढळला. चौकट १४ लाखांचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी डंपर (एमएच ०४, झेडई ९२३२) आणि त्यातील एक ब्रास वाळू जप्त केली. डंपरची किंमत १४ लाख रुपये, तर वाळूची किंमत सहा हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सह्याद्री बिले यांच्या नेतृत्वाखाली पोलिस कर्मचारी योगेश पाटील, विनोद बेलदार आणि विक्रम पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe on MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! थेट 'या' ९ परीक्षांची होणार कसून चौकशी; १६ नोव्हेंबरपूर्वी पुरावे देण्याचे कडक आवाहन

Smile Day : खळखळून हसा! एक नोव्हेंबरला साजरा करा ‘स्माइल डे’; ‘सकाळ माध्यम समूहा’चा उपक्रम

Israel Election: इस्रायल निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत नाही! नव्या राजकीय पेचप्रसंगाचा भारतासह इराण आणि गाझावर काय परिणाम होणार?

Marathi News Live Updates : रखडलेल्या तुर्भे उड्डाणपुलासाठी ठाकरे गटाचे रास्ता रोको

RailMadad: प्रवासात तुमच्या सामानाची चोरी झाल्यास रेल्वेकडून भरपाई मिळते का? जाणून घ्या काय आहेत नियम?

SCROLL FOR NEXT