SUN marathi  esakal
नाशिक

SUN मराठीतर्फे ‘मेळा मनोरंजनाचा’; आवडत्या कलाकारांशी थेट संवाद

नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात ‘मेळा मनोरंजनाचा’ कार्यक्रम.

ब्रिजकुमार परिहार

नाशिक : दक्षिण भारतातील आघाडीच्या सन टीव्हीची मराठी वाहिनी असलेल्या ‘सन मराठी’ तर्फे शनिवारी (ता. ४) दुपारी साडेतीनपासून दादासाहेब गायकवाड सभागृहात ‘मेळा मनोरंजनाचा’ हा कार्यक्रम होणार आहे. या मेळाव्यात मराठी मालिकांमधील आपल्या आवडत्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटण्याची, त्यांच्यासोबत संवादाची, तसेच मनोरंजन आणि विविध स्टॉलच्या माध्यमातून चविष्ट पदार्थांची मेजवानी, विविध खेळ खेळण्याची, कलाकारांसह सेल्फी काढण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे.

सर्वांसाठी मोफत प्रवेश असलेल्या या कार्यक्रमाबाबत सन टीव्हीचे विपणन हेड धीरेंद्र यशवंत, नीलेश पटवर्धन, आदिती मोरानकर, सचिन गिते यांनी गुरुवारी (ता. २) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना मानसी नाईक, धडाकेबाज अभिनेता पुष्कर जोग, आघाडीचा लावणी किंग व कोरिओग्राफर आशिष पाटील यांचे दमदार सादरीकरण हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण असेल. याशिवाय अशोक फळदेसाईसह सन मराठी वाहिनीवरून सादर होणाऱ्या सुंदरी, कन्यादान, नंदिनी, जाऊ नको दूर बाबा, आभाळाची माया, तसेच नव्याने सुरू झालेल्या माझी माणसं या मालिकेतील कलाकार नाशिककरांच्या भेटीसाठी येणार आहेत. तर, मेघना एरंडे आणि अंशुमन विचारे प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. या व्यतिरिक्त नाशिकमधील काही कलाकारदेखील या मेळाव्यात आपली कला सादर करणार आहेत.

विविध उपक्रम

‘सोहळा नात्यांचा’ हे ब्रीदवाक्य असलेली सन मराठी वाहिनी सप्टेंबर २०२१ पासून मराठी रसिकांना विविध दर्जेदार मालिकांची मेजवानी देत आहे. संस्थेने सुरवातीपासूनच आपल्या प्रेक्षकांना नात्यांनी सजलेल्या वेगवेगळ्या मालिका दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील वेगवेगळ्या शहरांत, गावागावांत जाऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचाही प्रयत्न या वाहिनीच्या चमूने केला आहे. शनिवारी होणारा ‘मेळा मनोरंजनाचा’ हा कार्यक्रमदेखील याच उपक्रमाचा एक भाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT