नाशिक

जागतिक पुरूष दिनविशेष

CD
एन्कर लोगो : जागतिक पुरुष दिनविशेष --- पुरुषांच्या खांद्यावरील ओझे अन्‌ मनातील कोलाहल व्यक्त न होण्यामुळे वाढवला ताण; मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा दीपिका वाघ : सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १८ : मुलगा, पती, वडिल, भाऊ, मित्र, आजोबा यासारखी असंख्य नाती निभावताना पुरुषाचा लहानापासून झालेल्या जडणघडणीत पुरुष कधीही रडत नसतो! समाजात वावरतांना पुरुष मजबूत असला पाहिजे. त्याने कुटुंबाचा आर्थिक भार न थकता पेलला पाहिजे शिवाय, त्याने संकटातही ढाल बनून अश्रू लपविले पाहिजे हे गृहीतच धरले जाते. त्यामुळे आजच्या समाजात पुरुषाची अवस्था ‘कमावण्याची धडपड अन भावनांचा कोंडमारा’ यासारखी झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त पुरुषांच्या ‘हळव्या’ बाजूवर प्रकाश टाकण्याची गरज निर्माण झाली आहे. महिलांच्या तुलनेत पुरुष सहजासहजी आपली दु:खे, आर्थिक ताण किंवा नैराश्य उघडपणे बोलून दाखवत नाहीत. समाजात आपली प्रतिमा कमकुवत होईल या भीतीपोटी ते मनातल्या मनात घुसमटत राहतात. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो. महागाईच्या युगात कुटुंबाची आर्थिक घडी बसवणे, नोकरी टिकविणे किंवा व्यवसायातील स्पर्धा यांमुळे तरुण आणि मध्यमवयीन पुरुषांवर प्रचंड ताण असतो. ‘वर्क-लाइफ बॅलन्स’ बिघडल्यामुळे अनेकदा ते नैराश्याच्या गर्तेत जातात, परंतु मदत घेण्यासाठी ते संकोचतात. मानसिक तणाव आणि नैराश्यातून बाहेर पडण्याचा मार्ग न सापडल्यामुळे अनेक तरुण सिगारेट, मद्यपान किंवा इतर व्यसनांच्या आहारी जातात. ताण लपवण्यासाठी वापरलेली ही साधने नंतर त्यांच्या आरोग्यासाठी अधिक घातक ठरतात. उदा : जवळच्या व्यक्तीचे अपघात, हृदयविकाराने अचानक निधन झाल्यासही पुरुषाला सतत ‘चिंता’ सतावते त्यालाच चिंतारोग अर्थात एन्झायटी म्हणतात. यामुळे पुरुषही माझ्या कुटुंबाच्या बाबत असे झाल्यास काय होईल? या विवंचनेत असतो. त्यासाठी सतत व्यक्त होत राहणे गरजेचे आहे. घरातील प्रत्येकाने पुरुषांनाही ''माणूस'' म्हणून समजून घेणे आणि त्यांच्या भावनांना मोकळी वाट करून देणे तितकेच महत्त्वाचे आहे. ‘पुरुष रडत नसतो’ या जुनाट समजुतीतून बाहेर पडून ‘पुरुषांना अश्रू किंवा भावना असतात’ हे स्वीकारण्याची वेळ आता आली आहे. ---कोट परिस्थिती कशीही असली तरी, घरात आनंददायी वातावरण असले पाहिजे. पुरुष व्यक्त झाला तर, त्यावर एकदम प्रतिक्रिया न देता, त्याला जज न करता शांतपणे त्याचे ऐकून घेतले पाहिजे. त्यानंतर सामोपचाराने कोणताही निर्णय घेता येऊ शकतो. -डॉ. जयंत ढाके, मानसोपचारतज्ज्ञ ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MG Road वरील खाऊ गल्लीत FDA ची धडक कारवाई; परवाना नसलेल्या पाच खाद्यविक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश

Yuzvendra Chahal 400 T20 Wickets: युझवेंद्र चहलने इतिहास रचला... ट्वेंटी-२०मध्ये असा पराक्रम करणारा पहिला भारतीय गोलंदाज

Youngest Demat Account Holder : वय अवघे ६ दिवस अन् थेट शेअर बाजारात एन्ट्री! १२ दिवसांचा जुना रेकॉर्ड मोडत दिल्लीच्या चिमुकल्याने रचला नवा विश्वविक्रम

Sudhir Mungantiwar : "आपलं सरकार इंग्रजांपेक्षाही वाईट..."; सुधीर मुनगंटीवार आक्रमक, मुख्यमंत्र्यांसमोरच मांडली भूमिका, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : सोनं-चांदी दरात पुन्हा घसरण; सोनं 2 हजार 800 रुपयांनी तर चांदी चार हजार रुपयांनी घसरली

SCROLL FOR NEXT