नाशिक

लाइफ सायन्सेसला भेट

CD
धुळे : मुख्य अंकातील पानासाठी... -- फोटो क्रमांक : 31597 वापी (गुजरात) : येथील मेरिल लाइफ सायन्सेस या नामांकित मेडिकल टेक्नॉलॉजी कंपनीच्या औद्योगिक भेटीवेळी एस.व्ही.के.एम. एनएमआयएमएस ग्लोबल युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ फार्मसी ॲन्ड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटच्या एम. फार्मसीचे विद्यार्थी. -- ‘एनएमआयएमएस’च्या विद्यार्थ्यांची मेरिल लाइफ सायन्सेसला भेट -- औद्योगिक अनुभवातून वैद्यकीय तंत्रज्ञान व निदानाच्या कार्यपद्धतीचे प्रत्यक्ष धडे सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ७ : येथील एस.व्ही.के.एम. एनएमआयएमएस ग्लोबल युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ फार्मसी ॲन्ड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटच्या एम. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी वापी (गुजरात) येथील मेरिल लाइफ सायन्सेस या जागतिक स्तरावरील नामांकित मेडिकल टेक्नॉलॉजी कंपनीला औद्योगिक भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी वैद्यकीय उपकरणांची निर्मिती, संशोधन व विकास, गुणवत्ता व्यवस्थापन, उत्पादन प्रक्रिया तसेच आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या विविध पैलूंची प्रत्यक्ष माहिती घेतली. फार्मसी शिक्षणामध्ये सैद्धांतिक ज्ञानासोबत औद्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव मिळणे महत्त्वाचे असते. आधुनिक फार्मास्युटिकल आणि हेल्थकेअर क्षेत्रामध्ये संशोधन, तंत्रज्ञान, गुणवत्ता, नवकल्पना आणि उत्पादन प्रक्रियेला विशेष महत्त्व आहे. याच उद्देशाने झालेल्या या भेटीत विद्यार्थ्यांनी कार्डिओव्हॅस्क्युलर, ऑर्थोपेडिक्स, एंडो-सर्जरी, ईएनटी, रोबोटिक्स आणि डायग्नोस्टिक्स या क्षेत्रांतील विविध वैद्यकीय उपकरणांच्या निर्मिती प्रक्रियेची माहिती घेतली. उत्पादन प्रक्रियेत अचूकता, स्वच्छता, सुरक्षितता, कार्यक्षमता आणि गुणवत्ता मानकांचे पालन कसे केले जाते, हे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जाणून घेतले. याशिवाय, डायग्नोस्टिक्स विभागात हेमॅटोलॉजी, बायोकेमिस्ट्री, कोॲग्युलेशन, एलायझा, सेरॉलॉजी तसेच रॅपिड डायग्नोस्टिक उत्पादनांच्या निर्मिती व वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नवीन वैद्यकीय उपकरणांची निर्मिती करताना संशोधन, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय गरजा आणि रुग्णांची सुरक्षितता यांचा समन्वय कसा साधला जातो, याची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. - तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे गरजेचे वर्गामध्ये मिळणाऱ्या सैद्धांतिक ज्ञानाला प्रत्यक्ष औद्योगिक अनुभवाची जोड मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये अधिक सखोलता येते. मेरिल लाइफ सायन्सेससारख्या आधुनिक मेडिकल टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपनीला दिलेली भेट विद्यार्थ्यांना संशोधन, नवकल्पना, गुणवत्ता आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरते. भविष्यातील फार्मसी व्यावसायिकांनी बदलत्या आरोग्यसेवा क्षेत्राशी जुळवून घेत नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन स्कूल ऑफ फार्मसी ॲन्ड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटचे प्राचार्य डॉ. समीर गोयल यांनी केले. या भेटीमुळे एम. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्राचा विस्तार केवळ औषधनिर्मितीपुरता मर्यादित नसून मेडिकल टेक्नॉलॉजी, वैद्यकीय उपकरणे, डायग्नोस्टिक्स, संशोधन व विकास आणि आरोग्यसेवा तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्येही मोठ्या प्रमाणावर होत असल्याची जाणीव झाली. सदर औद्योगिक भेटीचे समन्वयक विभागप्रमुख डॉ. किरण आहेर, प्रा. जुगल मंदान व प्रा. प्रांजल गुजराथी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Jantar Mantar Protest: शनिवारी सीजेपीचं पुन्हा 'जंतरमंतर'! मुख्य प्रवक्ते सौरव दास दिल्ली पोलिसांच्या भेटीला, म्हणाले...

IND vs WI 2nd T20I: नितीश रेड्डी, प्रिन्स यादव IN, वैभव सूर्यवंशी बाकावरच; दुसऱ्या ट्वेंटी-२० साठी Playing XI मध्ये सूचवला बदल

Sangli District Bank Election : आमदार सुरेश खाडेंसह सात जणांचे अर्ज बाद; पडळकर, विशाल पाटील, देशमुख यांना दिलासा, 21 जागांसाठी 295 अर्ज

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र, कर्नाटकातील हंगाम एकाच वेळी, राजू शेट्टी यांची जयसिंगपूरमध्ये शनिवारी ऊस परिषद

थिएटर फुटलं, अंधारातून पळालो, नानाने मला रिक्षात टाकलं अन् स्वतः... अशोक मामांनी सांगितला तो प्रसंग, काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT