Professor Vrind from MET Tantraniketan with student Vishal Satle, who discovered a bug in the social networking app Snapchat. esakal
नाशिक

Nashik : ‘Snapchat’मध्ये विशालने शोधला बग; METच्या विद्यार्थ्याची कामगिरी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : येथील विशाल सटले याने स्नॅपचॅट या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग ॲपमधील बग (तांत्रिक चूक) शोधत ती कंपनीला लक्षात आणून दिली आहे. यासंदर्भात ॲप विकसकांकडून तांत्रिक चूक स्‍वीकारल्‍याबाबतचा ई-मेल विशालला प्राप्त झाला आहे. विशाल हा मेट भुजबळ नॉलेज सिटी येथील पदविका अभ्यासक्रमातील तृतीय वर्षातील (आयटी) विद्यार्थी आहे. (MET College student Vishal Satle discovered bug in Snapchat app Nashik News)

मेट पॉलीटेक्निकचा विद्यार्थी असलेला विशाल हा सामंजस्य करारांतर्गत सायबर संस्कार या सायबर सुरक्षा देणाऱ्या नामांकित संस्थेत इंटर्नशिप करत आहे. याअंतर्गत त्‍याने सुरक्षेच्या दृष्टीने स्‍नॅपचॅटमधील महत्त्वाचा बग शोधण्याची कामगिरी करून दाखवली आहे. सायबर संस्कारचे संचालक तन्मय दीक्षित यांचे त्‍याला सहकार्य लाभले. विशालच्‍या कामगिरीबद्दल मेट भुजबळ नॉलेज सिटीचे विश्वस्त समीर भुजबळ, प्राचार्य डॉ. राजेंद्र नारखेडे, विभागप्रमुख संजीव पाटील, ट्रेनिंग व प्‍लेसमेंट अधिकारी प्रा. उमेश पाठक, प्रा. अनिल गोसावी आदींनी अभिनंदन केले आहे.

असा होता बग

या बग (तांत्रिक चूक) मुळे समोरील वापरकर्त्याने पाठवलेला फोटो हा स्क्रीन शॉटद्वारे आपल्याकडे ठेवता येऊ शकत होता. याबद्दल समोरील व्‍यक्‍तीला कल्‍पना नसल्‍याने, यातून गोपनीयता (प्रायव्हसी) अटी-शर्ती बाधित होत होत्‍या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datia Bypoll BJP Crisis : भाजपने माजी गृहमंत्र्यांचे तिकीट कापले, नाराज कार्यकर्त्यांकडून शहरात जाळपोळ, महामार्ग रोखला; पोलिसांवरही दगडफेक

Rameshbhai Kacholia Passes Away : हजारो सामाजिक संस्थांचा आधारवड हरपला, रमेशभाई गुलाबचंद कचोलिया यांचे मुंबईत निधन

Solapur: मोफत वधू-वर सूचक सेवेतून 3 हजारांहून अधिक संसारांना नवी दिशा; इरण्णा पनशेट्टी यांचे समाजसेवेचे प्रेरणादायी कार्य

Fake ₹500 Notes Seized : जळगावात सिनेस्टाईल थरार! बैलगाडीला धडक देऊन पळणाऱ्या कारमधून 500 रुपयांच्या नकली नोटा अन् तलवारी जप्त; 24 बंडले आढळल्याने गूढ वाढले

Akola: बोगस बियाण्यांवरून कृषी अधिकाऱ्यांना कक्षात डांबले; संतापाचा उद्रेक; शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

SCROLL FOR NEXT