mango
mango esakal
नाशिक

MGNREGA News: फळबाग लागवडीत फळांचा राजाच अव्वल! जिल्ह्यात 2 हजार 64 हेक्टरवर लागवड

सकाळ वृत्तसेवा

MGNREGA News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून फळबाग लागवडीत फळांचा राजा आंबा लागवडीलाच शेतकऱ्यांची पहिली पसंती मिळाली आहे.

जिल्ह्यात दोन हजार ६४ हेक्टरवर एक लाख ५९ हजार आंब्याची लागवड झाली आहे. नारळ आणि चिकू या फळबागांच्या माध्यमातून व फूल पिकांमध्ये उत्पन्नाची शाश्वती कमी असल्याने त्यांना सर्वांत कमी पसंती लाभल्याचे दिसून येते. (MGNREGA mango top in orchard cultivation Cultivated on 2 thousand 64 hectares in district nashik)

फळबाग लागवडीच्या माध्यमातून लागवडीखालील क्षेत्रात वाढ करणे, शाश्वत रोजगारनिर्मिती करून स्थानिक पातळीवर पूरक व्यवसायात वाढ करणे व उत्पादन वाढविणे, हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. लाभार्थ्यांस शंभर टक्के अनुदानावर सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर विविध फळझाडांची, वृक्षांची, फूल पिकांची, मसाला पिकांची लागवड करता येते.

या योजनेंतर्गत फळपिके, वृक्षा व इतर पिकांमध्ये आंबा, काजू, चिकू, पेरू, डाळिंब, संत्री, मोसंबी, कागदी लिंबू, नारळ, बोर, सीताफळ, आवळा, चिंच, कवठ, जांभूळ, अंजीर कलमे, साग, गिरीपुष्प, सिंधी, शेवगा, हादगा, बांबू, जट्रोफा, कढीपत्ता, पानपिंपरी, करंज व इतर औषधी वनस्पतींचा समावेश आहे.

नवीन फळ पिकामध्ये द्राक्ष, ड्रॅगनफ्रूट, ॲव्होकॅडो यांचा समावेश आहे. फूल पिकामध्ये गुलाब, मोगरा, निशिगंध, सोनचाफा या पिकांचा समावेश आहे. मसाला पिकामध्ये लवंग, दालचिनी, जायफळ, मिरी या पिकांचा समावेश आहे.

कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आंबा, पेरू, डाळिंब, सीताफळ, मोसंबी, लिंबू, चिकू, नारळ व मोगऱ्याची लागवड झाली आहे. यात आंब्याला प्रथम पसंती मिळाली असून, त्यापाठोपाठ पेरूची लागवड झाल्याचे दिसून येते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अशी आहे योजना

ज्या शेतकऱ्याच्या नावे जमीन आहे, तसेच लाभार्थी हा जॉबकार्डधारक व अल्प, अत्यल्प भूधारक असावा. लाभार्थ्यांनी लागवड केलेली फळझाडे, वृक्षांच्या दुसऱ्या वर्षी किमान ९० टक्के व तिसऱ्या वर्षी ७५ टक्के फळझाडे, वृक्ष जिवंत राहिले पाहिजे.

लाभार्थ्यांना ०.२० हेक्टर ते दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत फळझाड लागवड करता येते. इच्छुक शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ घेण्यासाठी संबंधित गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधता येईल.

जिल्ह्यातील फळबागांची स्थिती

पीक....क्षेत्र हेक्टर....रोपे

आंबा...२०६४.... १,५९,१७३

पेरू....५.८९.... ४,९६४

डाळिंब...२३४....१,७२,७४८

सीताफळ..८.५०....३,४००

मोसंबी....०.४०....१११

लिंबू....५....६११

चिकू...०.४०....४०

नारळ...४.८०....७२०

मोगरा...०.८०...आठ हजार

--------------------------------------

एकूण...२३२४.५७....३,४९,७६७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT