नाशिक

म्हाडाची फसवणूक प्रकरणी नायब तहसिलदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळले

CD
पान-३ ---------- म्हाडाची फसवणूक प्रकरण--लोगो ------------- ३०-२ नायब तहसीलदार पाटीलचा अटकपूर्व जामीन फेटाळला सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : शहर परिसरातील पाथर्डी शिवारात बनावट कागदपत्रांच्या आधारे म्हाडासाठी आरक्षित असलेली जागा आणि शहराची ''ओपन स्पेस'' बेकायदेशीरपणे हडपल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात दाखल गुन्ह्यातील तत्कालीन नायब तहसीलदार नितीन पाटील याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. के. के. पाटील यांनी फेटाळून लावला. न्यायालयाने यापूर्वीच तिघांचे अटकपूर्व जामीन फेटाळले आहेत. सुमारे २३ वर्षांनंतर खोटे नकाशे, मोजणी नकाशे व हिस्सा फॉर्म तयार करून शासन आणि म्हाडाची फसवणूक केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पाटील यांच्या फिर्यादीनुसार पाथर्डी शिवारातील सर्व्हे क्रमांक १७/२/अ आणि १७/२/ब (एकूण क्षेत्रफळ २४,८०० चौ.मी.) हा मोठा भूखंड रहिवासी क्षेत्रात मोडतो. संशयित प्लॉटमालक सिद्धार्थ ओमप्रकाश काबरा, भारती ओमप्रकाश काबरा आणि अरुणप्रकाश पंढरीनाथ आगीवाल यांनी तत्कालीन महसूल अधिकाऱ्यांच्या पत्राचा गैरफायदा घेत तलाठ्याकडून ४ हजार चौरस मीटरपेक्षा कमी क्षेत्राचे लहान- लहान ७/१२ उतारे तयार करून घेतले. या प्रकरणात तत्कालीन नायब तहसीलदार नितीन आबाजी पाटील याचाही समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयित सिद्धार्थ व भारती काबरा, आगीवाल यांनीही अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली असता न्यायालयाने त्यांचेही अर्ज फेटाळून लावले आहेत. सरकार पक्षासह फिर्यादी पाटील यांच्यातर्फे ॲड. अजिंक्य गिते, ॲड. प्रशांत जाधव व तपासी अधिकारी संतोष फुंदे यांनी युक्तिवाद केला. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA: दिवाळीआधी पुण्यात एफडीएचा मिठाई विक्रेत्यांना दणका! ४ हजार किलोहून अधिक खाद्यपदार्थांचा साठा जप्त

Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पनवेल-वसई थेट लोकलसाठी १२,७१० कोटींचा प्रस्ताव; १७ स्थानके, ६९ किमीचा नवा रेल्वेमार्ग

Latest Marathi News Live Update : घातक हत्यारे जवळ बाळगून फिरणाऱ्या दोघांना अटक

Pune News: एमपीएससी परीक्षा सुधारणांच्या नावाखाली मलमपट्टी? अंतरिम अहवालात जुन्याच शिफारशी; विद्यार्थ्यांची नाराजी

Pune News: पुण्यात ६५ लाखांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्त; शुक्रवार पेठेतील राहुल एजन्सीजवर कारवाई

SCROLL FOR NEXT