नाशिक

म्हाळसाकोरे उपकेंद्रात अतिरिक्त ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मरचे आमदार बनकर यांच्या हस्ते लोकार्पण

CD
OZM26B15020 म्हाळसाकोरे ः येथील उपकेंद्रात अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरच्या लोकार्पणप्रसंगी आमदार दिलीप बनकर, अधीक्षक अभियंता अनिल थोरात, कार्यकारी अभियंता अनिल शेतकरी, कार्यकारी अभियंता संदीप शिंदे यांच्यासह नागरिक. ---------------------- शेतकऱ्यांना सलग आठ तास वीजपुरवठा ------------ म्हाळसाकोरे उपकेंद्रात अतिरिक्त ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मर, आठ गावांची वीजसमस्या सुटणार सकाळ वृत्तसेवा ओझर, ता.१६ ः म्हाळसाकोरे येथील ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रात नव्याने उभारण्यात आलेल्या अतिरिक्त ५ एमव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते झाले. या ट्रान्सफॉर्मरमुळे गोदाकाठ परिसरातील आठ गावांतील वीज समस्येला मोठा दिलासा मिळणार असून, शेतीपंपांसाठी सलग आठ तास सुरळीत वीजपुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे. --------------- गोदाकाठ परिसरातील शेतीसाठी विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन आमदार बनकर यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल थोरात यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करून अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरचे काम पूर्णत्वास नेले. अतिरिक्त ५ एमव्हीए ट्रान्सफॉर्मरची भर पडल्याने म्हाळसाकोरे, मांजरगाव, खानगाव थडी, तारुखेडले, तामसवाडी, करंजी, ब्राह्मणवाडे व भुसे या आठ गावांतील वीजपुरवठा व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे. ----------- आश्वासने पूर्ण करणार ः बनकर आमदार बनकर म्हणाले,‘ या भागातील वीज समस्या सोडविण्यासाठी हा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर महत्त्वाचा ठरणार आहे. निवडणुका संपल्यानंतर मी कोणताही गट किंवा पक्ष मानत नाही,तर सर्वसामान्य जनतेच्या विकासाला प्राधान्य देतो. नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या दहा गेटचे काम पूर्णत्वास नेणे ही आपली जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले. ------------- आजपासून आठ तास वीज श्री. थोरात यांनी पाच एमव्हीए क्षमतेचा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाल्याने मंगळवारपासून (ता.१७) शेतकऱ्यांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सलग आठ तास अखंडित वीजपुरवठा देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या वीजविषयक कोणत्याही समस्या असल्यास त्या तातडीने सोडविण्यात येतील. महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल थोरात,कार्यकारी अभियंता अनिल शेतकरी,ओझर उपविभागाचे कार्यकारी अभियंता संदीप शिंदे तसेच शाखा अभियंता भेरुड उपस्थित होते. दत्तूभाऊ मुरकुटे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. जगन कुटे, सोपान खालकर, प्रवीण जगताप, वाळीबा जगताप,संतोष बाजारे,नंदू सांगळे आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमानंतर आमदार बनकर यांनी नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या दहा गेटच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाणी आवर्तनाच्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना देत सुरू असलेल्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. ------------------- २०-२ चौकट सिमेंट अस्तरीकरण होऊ देणार नाही नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या उजव्या कालव्याला पाटबंधारे विभागाकडून सिमेंट अस्तरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या भावना आणि विरोध लक्षात घेता हे काम कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, अशी ठाम ग्वाही आमदार दिलीप बनकर यांनी शेतकऱ्यांना दिली. त्यांच्या भूमिकेमुळे खानगाव थडी, तारुखेडले, तामसवाडी व करंजी परिसरातील शेतकऱ्यांनी धन्यवाद दिले. ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price: हॉलमार्क असलेलं सोनं खरंच शुद्ध असतं का? CAG च्या अहवालाने उघड झाला सरकारी यंत्रणेचा ढिसाळपणा

Syed Mushtaq Ali Trophy: संजू सॅमसनची तुफानी फटकेबाजी अन् मग निधीशच्या ५ विकेट्स; महाराष्ट्राचा केरळकडून दारुण पराभव!

Professor Recruitment Issue : प्राध्यापक भरतीचा मुहूर्त कधी? नऊ महिन्यांपासून प्रक्रिया रखडली; नेट-सेट, पीएच.डी.धारकांचे पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन

Water Cut Decision : वाढीव पाणी कपातीचा निर्णय लांबणीवर; पाटबंधारे विभागासोबतच्या निर्णयानंतर अंमलबजावणी

Pune News : वॉर्डन पुरविण्याची कोंडी सुटली; आयुक्तांनी स्थगिती उठवली

SCROLL FOR NEXT