नाशिक

म्हसावद उड्डाणपुलाला सुधारित प्रशासकीय मान्यता

CD
(मंत्री गुलाबराव पाटील यांचे संग्रहित छायाचित्र वापरावे) --- म्हसावद उड्डाणपुलाला सुधारित प्रशासकीय मान्यता --- ४५.८२ कोटींची मंजुरी; पालकमंत्री पाटील यांच्या पाठपुराव्याला यश सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ९ : जळगाव तालुक्यातील म्हसावद व परिसरातील हजारो शेतकरी, ग्रामस्थ आणि वाहनधारकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या पूर्णत्वातील मोठा प्रशासकीय अडथळा अखेर दूर झाला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे म्हसावद रेल्वे उड्डाणपुलाच्या ४५ कोटी ८२ लाख रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गुरुवारी (ता. ८) याबाबत शासन निर्णय निर्गमित केला असून, मूळ मंजूर २५ कोटी रुपयांच्या खर्चात झालेल्या २० कोटी ८२ लाख रुपयांच्या वाढीस मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झालेल्या उड्डाणपुलाच्या उर्वरित कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. म्हसावदजवळील सावखेडाफाटा-धरणगाव-एरंडोल-नेरी-जामनेर राज्य महामार्ग क्रमांक ४१ वरील रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी पालकमंत्री पाटील यांच्या प्रयत्नांतून २५ फेब्रुवारी २०२० ला २५ कोटी रुपयांची मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानुसार काम सुरू झाले. मात्र बांधकाम खर्चातील वाढ, वस्तू व सेवा कर, विमा शुल्क आणि अन्य तांत्रिक बाबींमुळे मूळ मंजूर रक्कम अपुरी पडत होती. यामुळे प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी पालकमंत्री पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ५ ऑगस्ट २०२६ ला मुंबईत झालेल्या व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव विचारात घेतला होता. त्यानंतर १९ ऑगस्टला संबंधित विभागाला आवश्यक निर्देश दिले. चौकट वाहतुकीचा खोळंबा होणार लवकरच दूर म्हसावद व परिसरातील अनेक गावांसाठी हा रेल्वे उड्डाणपूल दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. याचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे फाटकावरील वाहतुकीचा खोळंबा दूर होऊन परिसरातील प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुरळीत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : राज्यातील फासेपारधी व पारधी समाजाच्या अतिक्रमित जमिनींचे सातबारे करण्यासाठी कार्यवाही होणार

IND A vs AUS A 2nd ODI: भारताची पुन्हा हार, ऑस्ट्रेलियाकडून शिकार! पण 'एका'ने ठोकलाय न्यूझीलंड वन डे मालिकेसाठी दावा; कोण आहे तो?

Maharashtra Live News : सीईसीविरोधातील आंदोलनांप्रकरणी सात दिवसांत २७ एफआयआर दाखल

नवरा असावा तर फडणवीसांसारखा! पती अन् मुलीसमोर अमृता फडणवीसांनी सादर केलं गाणं, असं केलं बायकोचं कौतुक

Kaygaon News : कायगाव परिसरात ऊसतोडणी हंगामाची चाहूल; ऊसतोड मजूर दाखल, मात्र दुष्काळाने उसाची वाढ खुंटली, उत्पादन घटणार

SCROLL FOR NEXT