Micro small industries will now get guarantee free loan loans of up to 5 crores nashik news esakal
नाशिक

Nashik News : सूक्ष्म- लघू उद्योगांना विनातारण मिळणार 5 कोटीपर्यंत कर्ज : प्रदीप पेशकार

सकाळ वृत्तसेवा

सातपूर (जि. नाशिक) : लघुउद्योग क्षेत्रासाठी केंद्रातर्फे सकारात्मक व गरजेचे पाऊल उचलले गेलेले आहे. सूक्ष्म- लघू उद्योगांना यापुढे विनातारण पाच कोटीपर्यंत कर्ज मिळणार असल्याची माहिती भाजपच्या उद्योग आघाडीचे राज्य सदस्य प्रदीप पेशकार यांनी दिली. (Micro small industries will now get guarantee free loan loans of up to 5 crores nashik news)

याबाबत श्री. पेशकार यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. यापूर्वी असलेली गॅरंटी शुल्क उद्योजकांनी भरण्याची अट मागे घेण्यात आली आहे.

सूक्ष्म, लघू उद्योगांकडे भांडवल उभारणीसाठी थोडेच पर्याय उपलब्ध असतात, बँका तारण मागतात म्हणून केंद्राने क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस ही महत्त्वाची योजना सुरू होती. या अंतर्गत सूक्ष्म व लघु उद्योगांना रुपये दोन कोटीपर्यंत विनातारण कर्ज मिळण्याची सोय आहे.

त्यावर व्याजदर सोडून अधिकची दोन टक्के रक्कम काही ठिकाणी तीन टक्क्यांपर्यंत कर्जदाराला गॅरंटी फी द्यावी लागत असे. श्री. पेशकार यांनी केंद्रीय बैठकीत या गॅरंटी शुल्क कर्जदाराकडून न घेता बँकांकडून घेतली पाहिजे व विनातारण कर्जमर्यादा दोन कोटी वरून पाच कोटी करावी अशी ही मागणी केली होती.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

ती केंद्र शासनाने पूर्ण करून कर्जाची मर्यादा आता पाच कोटी केली आहे. केंद्रीय सूक्ष्म व लघू- मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेऊन उद्योग क्षेत्राला दिलासा दिला आहे अशी माहिती श्री. पेशकार यांनी दिली आहे.

सर्व राष्ट्रीयकृत बँका, सर्व खासगी बँका तसेच सक्षम व पूर्तता करणाऱ्या सर्व सहकारी बँकांकडून क्रेडिट गॅरंटी योजनेखाली पाच कोटी रुपयांपर्यंत कर्ज आता मिळू शकणार आहे. गॅरंटी शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणावर सवलत मिळेल.

केंद्राने दहा लाखापर्यंत कर्जावर ०.३७% , दहा ते पन्नास लाखपर्यंत ०.५५%, पन्नास ते एक कोटी पर्यंत ०.६०%, एक ते दोन कोटी पर्यंत १.२०%, दोन ते पाच कोटी पर्यंत १.३५% टक्के गॅरंटी शुल्क आकारले जाणार आहे. पर्यायाने विनातारण कर्ज घेणाऱ्या उद्योगांवर आता वार्षिक बोजा कमी पडणार आहे असेही श्री. पेशकार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajendra Singh: ध्येयवेड्यांनीच क्रांती केल्याचा इतिहास: जलपुरुष राजेंद्र सिंह; बंदुकीच्या जागी हातात कुदळ, फावडी

Latest Marathi News Live Update : सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, बाळा नांदगावकर यांची मागणी

कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीमध्ये घरात चिंतेचं वातावरण, दिराने सांगितलं कुटुबात नक्की चाललंय काय?

Mumbai News: एशियाटिक टाऊन हॉलची दुरवस्था! इतिहास जपायचा की निवडणुका जिंकायच्या? दुहेरी आव्हान उभं

Beed News: गरोदर महिलेच्या जिवाशी खेळ कशासाठी? लेबर रूमसमोरच महिलेची प्रसूती, बीड जिल्हा रुग्णालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT