midday meal
midday meal esakal
नाशिक

नाशिक : माध्यान्‍ह भोजन ठेक्‍याची प्रक्रिया पुन्‍हा सुरु

अरूण मलाणी

नाशिक : महापालिका शाळांमध्ये (NMC schools) सेंट्रल किचनच्‍या माध्यमातून विद्यार्थ्यांना माध्यान्‍ह भोजन (Midday Meal) देण्यात येत असते. कथित भ्रष्टाचाराच्या प्रकारानंतर ही संपूर्ण प्रक्रिया बारगळली होती. अशात आता माध्यान्‍ह भोजन ठेक्‍याची प्रक्रिया मंगळवार (ता.२४) पासून पुन्‍हा सुरू करण्यात आलेली आहे. तीन वर्षे कालावधी निश्‍चित केलेला असून, अटी व शर्तींची पूर्तता करावी लागणार आहे. (Midday meal contract process resumed Nashik News)

केंद्र शासनाचे (Central Government) निर्देश आणि राज्‍य शासनाच्‍या (State Government) सूचनांनुसार सेंट्रल किचन योजनेद्वारे (Central Kitchen Scheme) माध्यान्‍ह भोजन प्रक्रिया राबविण्यात येत होती. महापालिका व खासगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक अशा २७५ शाळांतील एक लाख १८ हजार ७१९ विद्यार्थ्यांना आहार पुरविला जात होता. दरम्‍यान मध्यंतरी अनियमितता व कथित भ्रष्टाचाराच्‍या घटनेनंतर तसेच बचतगटांनी न्‍यायालयात धाव घेतल्‍याने ही प्रक्रिया न्यायप्रविष्ट होती. अशात आता पुन्‍हा ठेक्याच्‍या प्रक्रियेला सुरवात झालेली आहे. पात्रता पूर्ण करणाऱ्यांना अर्ज सादर करता येणार आहे. अटी व शर्तींची पूर्तता करणे बंधनकारक राहील.

यापूर्वीच्‍या कंपन्यांसह स्वयंसेवी संस्था, बचत गट, आहार पुरवणाऱ्या संस्था आदींना कामासाठी पुढील प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. २०१९ मध्ये माध्यान्ह भोजनाचा ठेक्‍याकरीता नाशिकमधून २३ संस्थांनी निविदा सादर केल्या होत्या. यापैकी तेरा संस्‍थांना काम दिले होते. या संपूर्ण प्रक्रियेला बचत गटांनी विरोध केला होता. तसेच राजकीय मंडळाकडूनही बचतगटांसाठी आग्रह धरण्यात आला होता. मात्र आता पोषण आहाराचे कामाकरिता निर्धारित केलेल्‍या अटी व शर्तींची पूर्तता संबंधित संस्‍थांना करावी लागणार आहे. पुढील महिन्‍यात शैक्षणिक वर्षाला सुरवात होत असताना विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : सायना नेहवाल, राजकुमार राव यांचे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT