Commandos during mock drill in AP Sri Swaminarayan Mandir area. esakal
नाशिक

Nashik News : ...जेव्हा स्वामिनारायण मंदिरात शिरतात अतिरेकी!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : तपोवनातील नवीन शाही मार्गावरील नव्याने बांधलेल्या स्वामिनारायण मंदिरात शुक्रवारी (ता. २०) दुपारी बाराच्या सुमारास चार अतिरेकी शिरल्याचा निनावी फोन आडगाव पोलिस ठाण्यात खणखणतो.

त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत मंदिराला पोलिसांचा वेढा पडतो. त्यानंतर सुरक्षा पथक व अतिरेक्यांत दोन तास चाललेल्या तुफान धुमश्‍चक्रीनंतर पोलिसांनी चारही अतिरेक्यांचा खातमा केल्याने उपस्थित सर्वांचाच जीव भांड्यात पडतो. (militants enter BAPS Swaminarayan Temple mockdrill by city police Nashik News)

गतवर्षी लोकार्पण झालेले स्वामिनारायण मंदिर भाविकांना चांगलेच भावले असून मंदिर बघण्यासाठी व दर्शनासाठी मोठी गर्दी उसळत आहे. आगामी सण- उत्सवांच्या काळात या गर्दीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सुरक्षिततेचा आढावा घेण्यासाठी पोलिसांनी मॉकड्रील केले.

कारवाईत तब्बल दिडशे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्याचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

पोलिस उपायुक्त परिमंडळ एक किरणकुमार चव्हाण, चंद्रकांत खांदवे, प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त वसंतराव मोरे, सीताराम गायकवाड, अंबादास भुसारे, आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक विजय ढमाले, मध्यवर्ती गुन्हे शाखा डॉ. मदगुल, नीलेश माईनकर यांच्यासह चार वरिष्ठ पोलिस निरिक्षक, शंभर पोलिस कर्मचारी, अग्निशामक दल, बीडीडीएस व्हॅन, शीघ्रकृती दल, जलद प्रतिसाद पथक, श्‍वान पथक, ॲम्बुलस, पोलिस व्हॅन सहभागी झाले.

"या मॉकड्रीलमध्ये दीडशे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. आगामी सण- उत्सव निर्धोक पार पडावेत, यासाठी हे मॉकड्रील घेण्यात आले."

- किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

SCROLL FOR NEXT