नाशिक

१६.८५ लाखांची फसवणूक

CD
पान तीन ॲंकर ---------- सैन्यात नोकरीच्या आमिषाने फसवणूक पाच जणांकडून उकळले १६ लाख ८५ हजार रुपये - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १६ : भारतीय सैन्य दलात सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पाच जणांकडून १६ लाख ८५ हजार १४९ रुपये उकळल्याप्रकरणी तिघांविरुद्ध पिंपळनेर (ता. साक्री) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित कैलास मगन देसाई (रा. इदगाव पाडा, ता. साक्री) याला अटक केली. अजय पांडव चौधरी (रा. भुवाकी, ता. साक्री) व त्यांच्या नातेवाइकांच्या मुलांना महार रेजिमेंट, महू (मध्य प्रदेश) येथे नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून संशयित कैलास देसाई, राजू शंकर अहिरे (रा. वाखारी, ता. देवळा, जि. नाशिक) आणि नाना शिवाजी बेंद्रे (रा. देवळा, ता. देवळा, जि. नाशिक) याने दाखविले. यात ५ एप्रिल ते ११ सप्टेंबर २०२५ या कालावधीत अजय चौधरी यांच्यासह वसंत रघुनाथ मालुसरे, भारत यशवंत सूर्यवंशी, चतुर सत्यपाल मालुसरे आणि अर्जुन चौरे यांच्याकडून वेळोवेळी रक्कम घेतली. मात्र, नोकरी न लावता फसवणूक केली. याप्रकरणी चौधरी यांच्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. कैलास देसाई याला १५ ऑक्टोबरच्या रात्री अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: नव्या पर्वाची सुरुवात पण स्मृती मंधाना आणि झिम्बाब्वेच्या खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानावर का उतरले? नेमकं काय घडलं?"

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: MPSC पेपरफुटी चौकशी समितीची घोषणा, पण तुकाराम मुंढेंना अद्याप लेखी आदेशच नाही

SCROLL FOR NEXT