dewla maka photo1.jpg 
नाशिक

शेतकरी म्हणतो.."आता आत्महत्येचाच पर्याय...लष्करी अळीने आक्रमण केल्यामुळे भ्रमनिरास"

सकाळवृत्तसेवा

नाशिक / देवळा ः कसमादेतील काही भागात मकापिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने शेतकरी वर्ग चिंतित आहे. काहींनी फवारणी सुरू करत अटकाव करण्याचा प्रयत्न चालविला आहे. परंतु ज्यांचे पीक अधिक बाधित झाले आहे त्यांचा मका पीक नांगरून टाकण्याकडे कल दिसून येत आहे. निकम यांनी वेळेवर पाऊस झाल्याने पाच एकर क्षेत्रावर 13 किलो बियाणे पेरणी केली. त्यासाठी बियाणे 13 हजार रुपये, मशागत व पेरणी पाच हजार रुपये, मजुरी तीन हजार, रासायनिक खते दहा हजार व या अळीचा नायनाट व्हावा म्हणून कीटकनाशक आठ हजार असा 40 हजार रुपये खर्च झाला;

लष्करी अळीने आक्रमण केल्यामुळे भ्रमनिरास

परंतु लष्करी अळी आटोक्‍यात येत नसल्याने त्यांनी त्यांच्या गट क्रमांक 147/1/2 मध्ये उभ्या कोवळ्या पिकावर रोटर फिरविला. आधीच मक्‍याला अत्यल्प भाव मिळाल्याने आणि आता लष्करी अळीने आक्रमण केल्यामुळे मकापिकाने भ्रमनिरास केला असल्याची खंत निकम यांनी "सकाळ'कडे व्यक्त केली. कृषी सहाय्यक एस. आर. गडाख यांनी पाहणी केली. या वेळी कृषी समन्वयक कुबेर जाधव व इतर शेतकरी उपस्थित होते. 

मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. 

कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बांधावर येऊन पाहणी करावी व आजूबाजूच्या शेतकऱ्यांना या अळीपासून संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शन करावे. तसेच माझ्या शेतातील बाधित मक्‍याच्या पिकाचा पंचनामा करून आर्थिक मदत करून दिलासा द्यावा अन्यथा मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. 
-नंदलाल निकम, विठेवाडी, ता. देवळा 


शेतकऱ्यांनी या अळीबाबत घाबरून न जाता एकात्मिक व्यवस्थापनाप्रमाणे फवारणी करावी. निश्‍चितपणे ही अळी नियंत्रणात येते. त्यासाठी कृषी विभागातर्फे घडीपत्रिका तसेच सोशल मीडियातून कृषीसल्ला म्हणून मार्गदर्शन केले जात आहे. -- 
कैलास खैरनार, उपविभागीय कृषी अधिकारी, कळवण 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT