नाशिक

धुळे टुडे १ संक्षीप्त

CD
धुळे ः टुडे १ साठी, संक्षीप्त -- दूध विक्रेत्यावर लोखंडी रॉडने हल्ला धुळे : दूध विक्री करून घरी परतणाऱ्या तरुणाला रस्त्यात अडवून लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री लळींग टोलनाक्याजवळ घडली. याप्रकरणी दिवाणमळा (ता. धुळे) येथील गोपाल महादू गवळी याने मोहाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गोपाल शहरातून दूध विक्री करून घरी जात असताना टोलनाक्यापुढील चहाच्या टपरीजवळ उभ्या असलेल्या लंकेश रवींद्र बोरसे (कोळी, रा. लळींग) याने त्याला अडविले. दिवाणमळा गावात गाडी पकडल्याच्या जुन्या वादातून शिवीगाळ करून लोखंडी रॉडने गोपालच्या डोक्यावर वार केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी लंकेश बोरसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. - तिघांना मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा धुळे : भांडण सोडविण्यास गेल्याचा राग मनात धरून एकाला पत्नी आणि भाचीसह मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चौघांविरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी प्रवीण खुशाल बागुल (वय ४५, रा. नवलनगर, ता. जि. धुळे) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार तीन नोव्हेंबरला सायंकाळी सोमा प्रवीण भिल, शरद आणि राहुल (सर्व रा. नवलनगर) यांनी संगनमताने शिवीगाळ करून बागुल यांना मारहाण केली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या अरुणा बागुल आणि राजनंदनी संतोष भिल यांनाही मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेत खळबळ! पत्नीने AIच्या मदतीने रचला पतीच्या हत्येचा कट? ChatGPTच्या विरोधात खटला दाखल

यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

Latest Marathi News Live Update: पेनटाकळीच्या पाण्यासाठी नेत्यांची धावपळ; मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच..

Rohit Pathare case : २४ वर्षीय रोहित पठारेला घरातून उचललं, झाडाला बांधून बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

SCROLL FOR NEXT