Shower
Shower esakal
नाशिक

पाइपलाइन फुटली अन् 50 फुट उंच उडाला कारंजा; लाखो लिटर पाणी वाया

सतिश निकुंभ

सातपूर (नाशिक) : सातपूर- अंबड लिंक रोडवरील संजीवनगर परिसरात मंगळवारी (ता. २२) साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान पाइपलाइन फुटल्याची घटना घडली. अंबड एमआयडीसीची (MIDC) पाइपलाइन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

वाहनधारकांनी धुतली वाहने

दरम्यान, उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उन्हाचा पारा वाढल्यामुळे अनेक शहरांमध्ये आतापासून पाणी टंचाई निर्माण होत आहे. शहरी भागात पाण्याची कपात केली जात आहे. असे असताना नाशिक शहरातील सातपूर- अंबड लिंक रोडवरील पाइपलाइन फुटल्याने काही वेळ वाहतूक खोळंबली होती. आकाशाकडे झेप घेणारा भला मोठा कारंजाच निर्माण झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती, तर काही हुशार वाहनधारक या कारंजात आपली वाहने धुवून घेत होती. पाइपलाइन फुटल्यामुळे तब्बल ५० फूट उंच कारंजा या ठिकाणी तयार झाला होता. संपूर्ण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी साचले होते. या सर्व घटनेत मात्र लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. सातपूर- अंबड लिंक रोडवरील संजीवनगर परिसरात मंगळवारी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान ही पाइपलाइन फुटल्याची घटना घडली. अंबड एमआयडीसीची पाइपलाइन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. पाइपलाइन फुटल्यामुळे तब्बल ५० फुटांहून उंच पाणी उडाले होते. त्यामुळे रस्त्यावर एकच धावपळ उडाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT