नाशिक

ज्ञानाचा वापर कौशल्यासाठी, कौशल्याचा वापर उदयोजकतेसाठी -जिल्हाधिकारी रोहनजी घुगे

CD
फोटो क्र ः NSK26H31613 जळगाव ः माइंड स्प्रिंग-२०२६’चे उद्घाटन करतेप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे शेजारी यशवंत शितोळे, भालचंद्र पाटील, ॲड. प्रवीणचंद्र जंगले ––– फोटो क्र ः NSK26H31614 जळगाव ः माइंड स्प्रिंग-२०२६’चे प्रदर्शनात लावलेले स्‍टॉल. ––– ज्ञानाचा वापर कौशल्यासाठी, कौशल्याचा वापर उद्योजकतेसाठी (उपशीर्षक) जिल्हाधिकारी रोहन घुगे ः माइंड स्प्रिंग-२०२६’चे उद्घाटन सकाळ वृत्‍तसेवा जळगाव, ता. ७ ः ज्ञानाचा वापर कौशल्यासाठी आणि कौशल्याचा वापर व्यवसाय व उद्योजकतेसाठी केला, तर यश निश्चित मिळते, असा संदेश जिल्‍हाधिकारी रोहन घुगे यांनी विद्याथ्‍र्यांना मार्गदर्शन करताना दिला. खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सेंटर आणि हायर अँड टेक्निकल एज्युकेशन करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘माइंड स्प्रिंग-२०२६ एक्झिबिशन-कम-सेल’चे उद्घाटन आज मु. जे. महाविद्यालयाच्या बास्केटबॉल कोर्टवर झाले. प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि करियर कट्टाचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांच्या हस्ते झाले. पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष तथा केसीईचे मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य भालचंद्र पाटील अध्‍यक्षस्‍थानी होते. यावेळी केसीईचे सचिव प्रमोद पाटील, ॲड. प्रवीणचंद्र जंगले, डॉ. डी. टी. पाटील, कान्ह ललित कला केंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर यांच्यासह केसीईच्‍या विविध शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ३ शाळांचे २१ स्टॉल्स, केसीईच्या अंतर्गत येणारे मू. जे. महाविद्यालय, आयएमआर कॉलेज, इंजिनिअरिंग, बी एड कॉलेज, विधी महाविद्यालय यांचे एकूण १४० संघ यांनी सहभाग नोंदवला. जिल्‍हाधिकारी घुगे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या प्रकल्पांचे प्रोजेक्‍ट शोकेस करण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळत आहे. या संधीमुळे त्यांचा आत्मविश्वास निश्चितच वाढेल आणि भविष्यात या संधीचे सोने करून यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाधिकारींनी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना विशेष भेट देत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, नवोन्मेषाला आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणे. तसेच त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे हा या भेटीमागील मुख्य हेतू असल्याचे स्पष्ट केले. तर खानदेशच्या मातीतून गगनभरारी घेणारे उद्योजक या उपक्रमाच्या माध्यमातून घडतील, असा विश्वास यशवंत शितोळे त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक व्यक्ती आपल्या अनुभवातून काहीतरी शिकवण्यासाठी आणि देण्यासाठी आलेली असते. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना योग्य दिशा आणि संधी मिळाल्यास भविष्यातील उद्योजक निश्चितपणे घडतील, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Athawale on Gyanesh Kumar : 'ज्ञानेश कुमार काहीही झाले तरी राजीनामा देणार नाहीत'; अभिजीत दीपकेंच्या आंदोलनावर रामदास आठवले स्पष्टच बोलले, दिला कडक इशारा

Pune News : खेळाच्या मैदानावरील अनधिकृत इमारत महापालिकेच्या बांधकाम विभागाने केली जमीनदोस्त

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक विधान परिषद निवडणुकीसाठी ४८ उमेदवार रिंगणात; ९ ऑक्टोबरला माघारीची अंतिम मुदत

Uruli Kanchan News : पोलिसांच्या कर्तव्य भावनेने मजूर दांपत्याला मिळाला आधार! खाकी वर्दीतील माणुसकी आली धावून

Ishan Kishanने मोडला विराट कोहलीचा १० वर्षे जुना विक्रम; भारतीय खेळाडूंच्या 'या' लिस्टमध्ये अव्वल

SCROLL FOR NEXT