नाशिक

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ९ हजार पेन्शन द्या सीटू ची मागणी : पीएफ आयुक्तांना निवेदन

CD
फोटो : B10830 सातपूर : आयुक्त मनोज कोळी यांना निवेदन देताना सीटू जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे, देविदास आडोळे, तुकाराम सोनजे -- निवृत्त कर्मचाऱ्यांना ९ हजार पेन्शन द्या ‘सीटू’ची मागणी; पीएफ आयुक्तांना निवेदन सातपूर, ता. १८ : निवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा किमान ९ हजार रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह लागू करावी, तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना ७५ टक्के पेन्शन देण्यात यावी, अशी मागणी नाशिक जिल्हा सीटूतर्फे पीएफ आयुक्त मनोज कोळी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली या निवेदनात म्हटले आहे, की सध्याच्या महागाईच्या काळात मिळणारी पेन्शन अपुरी पडत असून अनेक निवृत्त कामगारांना औषधोपचार आणि कुटुंबाचा खर्च भागविताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे किमान ९ हजार रुपये पेन्शन महागाई भत्त्यासह लागू करणे आवश्यक आहे तसेच पेन्शनधारकाच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळते. ही परिस्थिती टाळण्यासाठी वारसांना ७५ टक्के पेन्शन देण्याची तरतूद लागू करावी, अशीही मागणी करण्यात आली. या वेळी जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस देवीदास आडोळे, तुकाराम सोनजे, सतीश खैरनार, अरविंद शहापुरे, मोहन जाधव, ज्ञानेश्वर माळी, दिलीप भोळे, गोविंद देसले, तानाजी डोके आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Payment: ग्राहकांसाठी महत्त्वाचे! देशात उद्या 45 मिनिटं बंद राहणार यूपीआय सेवा; पैशांची देवाण-घेवाण होणार नाही

Maharashtra Lift Rules 2026 : १२ वर्षांखालील मुलांना आता एकट्याने लिफ्ट वापरता येणार नाही; राज्यात नवे कडक नियम लागू, उल्लंघन केल्यास थेट परवाना रद्द!

SMAT 2026: सूर्यकुमार यादव यावेळी मात्र फसला; ललित यादवच्या वादळी खेळीने मुंबईला रडवले, पण तरी हरला गोवा संघ!

Latest Marathi News Live Update : शायना एनसीविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, मुंबई प्रेस क्लब बाहेर निदर्शनं

Sona Mohapatra On Salman Khan : सैनिकांच्या बलिदानावरचा सिनेमा आणि 'दोन पेग'चं गाणं? सलमान खानवर सोना मोहापात्राचा संताप; म्हणाली, "कोणाच्या करिअरला..."

SCROLL FOR NEXT