minimum temperature in Nashik is 9.2 degrees
minimum temperature in Nashik is 9.2 degrees  
नाशिक

नाशिककरांना पुन्‍हा भरली हुडहुडी; किमान तापमान ९.२ अंशांवर 

अरुण मलाणी

नाशिक : वातावरणातील बदलांमुळे निरनिराळे अनुभव सध्या नाशिककर घेत आहेत. काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हैराण केले होते. सध्या फेब्रुवारी महिन्‍यात वातावरणातील गारठ्याने नाशिककरांमध्ये हुडहुडी भरली आहे. सोमवारी (ता.८) नाशिकचे किमान तापमान ९.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. 

यापूर्वी नोव्‍हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्‍यातील काही दिवस सोडल्‍यास यंदाच्‍या हिवाळी हंगामात फारसा गारठा जाणवला नव्‍हता. परंतु आता फेब्रुवारी महिन्‍यातील गारठा नाशिककरांची चांगलीच परीक्षा घेतो आहे. गेल्‍या काही दिवसांपासून नाशिकच्‍या किमान तापमानात सातत्‍याने घट नोंदविली जात आहे. रविवारी (ता.७) तापमान दहा अंशांपर्यंत घसरले होते. सोमवारी (ता.८) किमान तापमान ९.२ अंश सेल्सिअस असल्‍याची नोंद झालेली आहे. कमाल तापमान २८.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. आणखी काही दिवस वातावरणात अशाच प्रकारे थंडी राहणार असल्‍याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT