Minister Chhagan Bhujbal criticism of Sambhaji Bhide politics Sakal
नाशिक

Nashik News : काहीही बोलणाऱ्यांना लगाम घाला; मंत्री छगन भुजबळ यांची संभाजी भिडेंवर टीका

इतिहासावर काहीही बोलणाऱ्यांना आपण लगाम घातला पाहिजे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ‘‘ कोणत्याही ब्राह्मण समाजात संभाजी, शिवाजी अशी नावे ठेवत नाही. मनोहर कुलकर्णी हे काहीही बोलतात, आंबा खाल्ल्यावर म्हणे अपत्य होते! असे झाले असते तर मग मेडिकल कॉलेजची काय गरज होती? इतिहासावर काहीही बोलणाऱ्यांना आपण लगाम घातला पाहिजे.

शासन आपल्या दारी यातील सगळ्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे. निवडणुकीत तुम्हाला काय करायचे ते करा,’’ असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. ते ‘मराठा विद्या प्रसारक मंडळा’च्या मखमलाबाद येथील शैक्षणिक संकुलात समाज दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

भुजबळ म्हणाले, ‘‘ फुले , शाहू , आंबेडकर यांनी एका समाजासाठी काम केलेले नाही, त्यांनी सर्वांसाठी काम केले. आज जे आपण शिक्षण घेत आहोत त्यांच्यामुळे घेत आहोत. तसेच मी देखील त्यांच्यामुळेच शिकलो. त्यामुळे ते आपले देव आहेत.

आपण ज्यांचे फोटो लावतो त्यांनी किती शाळा काढल्या? त्यांनी कुणाला शिकवले? शिक्षणाच्या प्रश्नावर सर्वांनी जातिभेद, मतभेद दूर करत एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. माळी समाजात अनेक जाती पोटजाती आहेत. ते सुद्धा एकत्र येत नाही. जातीपातीचे राजकारण सोडून आपण एकत्र आलो पाहिजे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jewellers Strategy Gold: सोने विक्रमी उच्चांकावर असताना सराफ “विक्री करा” ऐवजी “आणखी खरेदी करा” असे का सांगतात?

Loni Kalbhor News : कोचिंग क्लासला गेलेली १४ वर्षीय मुलगी बेपत्ता; भावाचे लक्ष नसल्याची संधी साधून पळवून नेल्याचा संशय

Melbourne Vasai Easter Fest: मेलबर्नमध्ये वसईची परंपरा कायम: २१ वर्षांपासून इस्टर मेळाव्यात लोकसंगीत, नृत्य, खाद्यसंस्कृतीचा जल्लोष

Vaijapur Accident : मोठी बातमी! भोंदू बाबा अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं निधन; समृद्धी महामार्गावर कंटेनरला कारची पाठीमागून जोरदार धडक

Rahul Gandhi : पंतप्रधान आणि मला तर बायकोसुद्धा नाही... ; राहुल गांधी असे काय म्हणाले ज्यामुळे सभागृहात हास्यकल्लोळ झाला?

SCROLL FOR NEXT