chhagan bhujbal esakal
नाशिक

नाशिक : मंत्री छगन भुजबळ धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील कार्यक्रमातून परतत असतांना नाशिक पुणे महामार्गावर चारचाकी आणि दुचाकीमध्ये अपघात झालेला होता. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी आपला वाहनाचा ताफा थांबवित तातडीने अपघातग्रस्तांची भेट घेतली. त्यांनी आपल्या कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने आपल्या ताफ्यातील गाडी अपघातग्रस्ताला उपलब्ध करून देत तातडीने सिन्नर येथील रुग्णालयात पाठविले.

त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या स्वीय सहायकाना सूचना करत सिन्नर (Sinnar) येथील डॉक्टरांना माहिती देऊन योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच अपघात ग्रस्त कुटुंबाला आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यानंतर त्यांचा ताफा नाशिककडे मार्गस्थ झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधान परिषद निवडणूक! मतदार सदस्यांना जमा करावी लागणार शस्त्रे, पोलिस अधीक्षकांनी काढले आदेश; सोलापूर जिल्ह्यात ६१६ मतदार, २२ जणांना वैयक्तिक बंदोबस्त

Panchang 27 May 2026 : पद्मिनी एकादशीसह बुधवारी खास योग! जाणून घ्या संपूर्ण पंचांग

आजचे राशिभविष्य - २७ मे २०२६

करिअर वेध : पराकोटीचा ध्यास

विशेष : डिजिटल डिझायनर : मिडजर्नी

SCROLL FOR NEXT