Chhagan Bhujbal esakal
नाशिक

नाशिक : गुढीपाडवा परवानगी वादात पालकमंत्री भुजबळांची मध्यस्थी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या काही संस्थांच्या कार्यक्रमांना परवानगी देण्याच्या वादात बुधवारी (ता. ३०) पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मध्यस्थी केली. पोलिस आयुक्त दीपक पांडे (CP Deepak Pandey) व नववर्ष स्वागत समिती अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांच्यातील वादानंतर पोलिस आयुक्तांसोबत बैठकीनंतर भुजबळांनी सगळ्या कार्यक्रमांना परवानगी मिळेल, असे स्पष्ट केले. बुधवारी श्री. भुजबळ यांच्या निवासस्थानी बैठक होताच गुढीपाडव्यानिमित्त पोलिसांकडे आलेल्या शहरातील प्राप्त अर्जानुसार कार्यक्रमांना पोलिस परवानगी दिल्याचे भुजबळ यांना सांगितले.

सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे नियोजन करणाऱ्या आयोजकांना चर्चेस बोलविले तरी ते येत नाही. चर्चा न करताच परवानगी मागत आहेत. ते अजिबात सयुक्तिक नसल्याचे पांडे यांनी सांगितले. सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करताना नाशिक शहर पोलिस आयोजकांना विविध कागदपत्रांची मागणी करतात. त्यातून आयोजक आणि पोलिसांमध्ये वाद होत आहेत. शहरातील विविध कार्यक्रमांना पोलिस परवानगी देताना टाळाटाळ केली जात असल्याचा आयोजकांचा आरोप होता. गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत यात्रा समितीने पाच दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या परवानगीसाठी अडवणूक होत असल्याचा आरोप केला होता. श्री. भुजबळ यांनी बुधवारी (ता. ३०) भुजबळ फार्मवर बैठकीत नववर्ष स्वागत कार्यक्रमांना पोलिस परवानगी देण्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर संयुक्तपणे पत्रकारांशी बोलताना पोलिस आयुक्तांनी परवानगीसाठी येणाऱ्या सर्व अर्जदार व्यक्ती व संस्थांना परवानगी देणार आहे, असे स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT