Minister Chhagan Bhujbal and others at the launch of Ananda ration. esakal
नाशिक

Chhagan Bhujbal: आनंदाचा शिध्यापासून लाभार्थी वंचित ठेऊ नका : मंत्री छगन भुजबळ

सकाळ वृत्तसेवा

Chhagan Bhujbal : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या पुरवठा विभागातर्फे राज्यातील एक कोटी ५७ लाख आनंदाचा शिधा संचवाटप करण्यात येणार आहे.

यात प्रत्येक लाभार्थ्याला आनंदाचा शिधा मिळेल, त्यापासून कोणीही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता अधिकऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (ता. ८) येथे दिले. (Minister Chhagan Bhujbal statement Dont deprive beneficiaries of anandacha shidha nashik)

येथील महात्मा फुले नाट्यगृहात आनंदा शिधा वाटपाचा प्रारंभमावेळी ते बोलत होते. पुरवठा विभागाच्या उपायुक्त प्रज्ञा बढे-मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे आदी उपस्थित होते. १५० लाभार्थ्यांना आनंदाचा शिधावाटप करण्यात आला. नव्याने ५०० शिधापत्रिका वितरित करण्यात आल्या.

मंत्री भुजबळ म्हणाले, की गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील साधारण ७ कोटी जनतेला या शिधाचा लाभ होणार आहे. जिल्ह्यातील साधारण सात लाख ७८ हजार लाभार्थ्यांना शिधा संचवाटप करण्यात येणार आहे.

शिधा संचात एक किलो रवा, एक किलो चना डाळ, एक किलो साखर व एक लिटर खाद्यतेल या चार जिन्नसांचा समावेश आहे. हा संच प्रतिशिधापत्रिकाधारका ई-पॉस प्रणालीद्वारे १०० रुपयांत दिला जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

राज्यातील गोर गरीब जनतेला लाभ मिळवून देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. तालुक्यात १४० स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून दारिद्र्यरेषेखालील, पिवळे, केसरी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा संचांचे वाटप होणार आहे.

तालुक्यातील अंत्योदय योजनेतून ९ हजार ५८६ व प्राधान्य योजनेतून २८ हजार ४१४, अशा साधारण ३८ हजार लाभार्थ्यांना या शिधा संचाचा लाभ होणार आहे.

ओबीसींसाठी राज्यात १२ लाख घरे बांधण्यात येणार असून, त्‍यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे १२ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्याधिकारी किरण देशमुख, तहसीलदार आबा महाजन, नायब तहसीलदार निरांजना पराते, स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दीपक लोणारी, मकरंद सोनवणे, बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर दराडे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT