Missing esakal
नाशिक

Nashik : अल्पवयीन चिमुरडीला तासाभरात शोधले

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शाळा सुटल्यानंतर आश्रमात न परतलेल्या ९ वर्षीय मुलीची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल होताच सरकारवाडा पोलिसांनी तासाभरात चिमुरडीला शोधून आश्रमाच्या सुपूर्द केले. पोलिसांनी घेतलेल्या तत्परतेचे यामुळे कौतुक होत आहे. (Minor girl found within an hour Nashik Latest marathi news)

घारपुरे घाटावरील आधाराश्रमात राहणारी नऊ वर्षांची मुलगी एमजी रोड परिसरातील शाळेत शिकण्यासाठी जाते. शनिवारी (ता. ६) ही चिमुरडी नेहमीप्रमाणे शाळेत गेली. परंतु शाळेतील ती वेळेत परतली नाही. त्यामुळे आश्रमाच्या तृप्ती मकवाना यांनी सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून चिमुरडी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

या तक्रारीमुळे सरकारवाडा पोलिसांनी एक पथक तयार करण्यात येऊन शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश नेमाने यांना एका बेपत्ता मुलगी सापडल्याची खबर मिळाली. पोलिसांनी तत्काळ गोदाघाटावरील दहिपूल गाठला. त्याठिकाणी जागरूक नागरिक विकास शिंदे, सतीश तुपे यांच्याजवळ एक बेपत्ता मुलगी होती.

आश्रमाची बेपत्ता झालेलीच ती चिमुकली असल्याने पोलिसांची शोध मोहिमेला यश आले. सदर मुलीला ताब्यात घेऊन पोलिसांनी तिला आश्रमाच्या तृप्ती मकवाना यांच्या हवाली केले. सदरील मोहीम पोलिस शिपाई नाजीम शेख, महाले यांनी बजावली. तासाभरामध्ये बेपत्ता मुलीचा शोध लावल्याने पोलिसांच्या या कामगिरीने कौतुक होते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT