The housewives are busy making the required amount of chili for the year. esakal
नाशिक

Mirchi Rates Hike : भाव वाढल्याने यंदा मिरची तिखट!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वर्षभर वापरासाठी मसाला बनवण्याची लगबग सध्या सुरू असून, यंदा नंदुरबार, लवंगी आणि कर्नाटकच्या काश्मिरी मिरचीला महिलांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. मिरचीच्या दरात प्रतिकिलो २५ ते ५० रुपये वाढ झाल्याने यंदा ‘तडका’ महागला आहे.

शहरातील एका कुटुंबात सरासरी चार व्यक्ती असतील, तर त्यांना वर्षभर एक किलो लाल मसाला आणि एक किलो काळा मसाला लागतो. मसाला बनवायचा म्हटलं, की मिरची आलीच. त्यादृष्टीने नाशिकच्या बाजारात नंदुरबार, लवंगी, पटणा, जळगाव फापडा, चंकेश्‍वरी, कर्नाटकची काश्मिरी, बेडगी, चपाटा असे मिरचीचे प्रकार बघायला मिळतात.

यात सर्वाधिक मागणी ही नंदुरबार, लवंगी आणि कर्नाटकच्या काश्मिरीला दिसून येते. काश्मिरी मिरची ६०० रुपये किलो दराने मिळते. तरीही ग्राहक रंगीत मसाला बनवण्यासाठी या मिरचीचा वापर करतात. विक्रेत्यांकडे मिरचीसोबतच खडा मसालादेखील विक्रीसाठी उपलब्ध आहे.

५०० ते १६०० रुपयांपर्यंत विविध कंपन्यांचा खडामसाला मिळतो. एक किलो मसाल्यासाठी एक किलो खडामसाला, दोन किलो मिरची, दोन किलो खोबरे, अर्धा किलो धने, आतपाव हिंग, जिरे, हळद यांचा वापर होतो. मसाला बनवताना खडामसाल्यातील काही पदार्थ भाजून घेतले जातात.

काही लोक हा मसाला न भाजताही वापरतात. मसाल्याची चव बदलण्यासाठी एकाच मसाल्यात वेगवेगळ्या प्रकारची मिरची वापरली जाते. काळा व लाल रंगाचा मसाला तयार करण्याची पद्धतही वेगवेगळी आहे.

गृहिणी त्यांच्या पद्धतीने हा मसाला तयार करतात व त्यांच्या आवडीनुसार खोबरे, खडामसाला व मिरचीचा वापर करतात. एक किलो मसाला बनवण्यासाठी साधारणत: दोन हजार रुपये खर्च येतो.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

असे आहेत मिरचीचे दर (प्रतिकिलो रुपयांमध्ये)

* नंदुरबार : २५०

* लवंगी : २८०

* पटणा : २८०

* जळगाव फापडा : २८०

* चंकेश्‍वरी : २७०

* काश्मिरी : ६००

* बेडगी : ४००

* चपाटा : ३००

"दर वर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्यांचा वापर करून मसाला तयार करते. यंदा मिरचीचे भाव वाढले असले, तरी मसाला बनवणारच आहे. नंदुरबार, लवंगी आणि चपाटा मिरचीचा आम्ही उपयोग करतो." -माधुरी परदेशी, गृहिणी

"मसाले बनवण्यासाठी मिरचीची मागणी वाढली आहे. ग्राहकांच्या पसंतीनुसार आम्ही विविध प्रकारच्या मिरच्या देठांसह किंवा देठ नसलेल्या अशा स्वरूपात देतो. ग्राहकांना आवडतील अशा सर्व प्रकारची मिरची आमच्याकडे उपलब्ध आहे."

-संगीता कारभारी, विक्रेत्या, आनंद आणि कंपनी, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT