Crime
Crime esakal
नाशिक

Nashik Fraud : फ्रान्सिस चव्हाणांकडून कोट्यावधीचा गैरव्यवहार; योगेश पाथरे, जीवने हिरेंचा पत्रकार परिषदेत आरोप

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fraud : महानगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रभारी प्रशासन अधिकारी फ्रान्सिस चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून मुब्बशेरा मोहम्मद इस्माईल यांना पुर्ननियुक्ती दिली.

त्यांचे थकीत वेतन अदा केल्याच्या कारणावरून नाशिक शिक्षण विभागाचे विभागीय उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण यांनी त्यांना निलंबित केले आहे. दरम्यान फ्रान्सिस चव्हाण यांनी अनुकंपा तत्त्वावर बेकायदेशीर शिक्षक भरती केली.

शिक्षकांच्या वेतनासाठी वारंवार पैसे काढून सुमारे तीन कोटीहून अधिक रक्कमेचा गैरव्यवहार केला. असा आरोप या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे तक्रारदार भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश पाथरे व सामाजिक कार्यकर्ते जीवन हिरे यांनी सोमवारी (ता.१५) येथे पत्रकार परिषदेत केला. (Misappropriation of Crores by Francis Chavan Yogesh Pathre Jeevane Hire allegation in press conference Nashik Fraud crime news)

श्री. पाथरे म्हणाले, की शासनाने संबंधितांविरुद्ध बनावट खोटे दस्तऐवज व कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याबद्दल फ्रान्सिस चव्हाण, त्यांना सहकार्य करणारे अधिकारी यांच्याविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करावा.

मुब्बशेरा मोहम्मद इस्माईल यांच्यासह नियमबाह्य नियुक्त केलेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करून त्यांना आतापर्यंत अदा केलेल्या वेतनाची वसुली करण्यात यावी. शिक्षण मंडळ आरक्षण अनुशेष बिंदूनामावली मागासवर्गीय आयुक्तांकडून तपासणी झाली नसताना मनमानी पद्धतीने खुले प्रवर्ग निश्‍चित करून परस्पर नियुक्ती देणाऱ्या सर्व दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी.

शासनाचे अव्वर सचिव एस. डी. माने यांनी राज्यात वाटप केलेल्या आदेशाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

श्री. पाथरे यांनी या संदर्भात २०२२ मध्ये मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे. चव्हाण यांच्या निलंबनानंतरही मुब्बशेरा मोहम्मद इस्माईल सेवेत कायम आहेत. त्यांच्या नियुक्ती प्रकरणाची नस्ती शिक्षण मंडळातून गायब आहे.

त्यांचे वेतन अद्यापही सुरु असून ते बंद करावे. श्री. चव्हाण यांनी अनुकंपा तत्वावर केलेल्या बेकायदेशीर शिक्षक भरतीची चौकशी करावी. विशेष म्हणजे पिता सेवेत असताना पुत्राची अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीचे दोन प्रकार घडले आहेत.

आपण या फसवणूक व गैरव्यवहारांविरोधात आवाज उठविल्याने माझ्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात दमबाजीची खोटी तक्रार दाखल केल्याचे श्री. पाथरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT