Missing case esakal
नाशिक

Nashik News : 3 वर्षापासून बेपत्ता मुलीला शोधण्यास यश

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : तीन वर्षापूर्वी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीस हुडकून काढण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने मुलीसह तिच्या प्रियकरास कोपरगाव (ता. इगतपुरी) येथे ताब्यात घेतले असून, दोघांना इंदिरानगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. (Missing girl found for 3 years Nashik News)

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीत राहणारी मुलगी २०२० मध्ये बेपत्ता झाली होती. तिला कोणी तरी फूस लावून पळवून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस अपहृत मुला- मुलींचा शोध घेत असताना अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे उपनिरीक्षक सुनील माळी यांना बुधवारी (ता. ११) मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कोपरगाव गाठून मुलीसह तिला पळवून नेणाऱ्या प्रियकरास ताब्यात घेतले असून, दोघांना इंदिरानगर पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही कारवाई उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. आँचल मुदगल, सहाय्यक निरीक्षक धर्मराज बांगर, उपनिरीक्षक माणिक गायकर, उपनिरीक्षक सुनील माळी, हवालदार शेरखान पठाण, आनंदा काळे, पोलिस नाईक गणेश वाघ, वैशाली घरटे आदींच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आंदोलनापुढे सरकार झुकलं? NTA मधील बदलांवर आज रात्री मोठी घोषणा होण्याची शक्यता

बांगलादेशात मोठा राजकीय उलटफेर! राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांचा राजीनामा; कार्यकाळ २०२८ पर्यंत असतानाही का पद सोडले?

Pune Metro Safety Nod: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला सुरक्षा मंजुरी; ‘माण–बालेवाडी’ टप्पा सुरू करण्याचा निर्णय आता सरकारच्या कोर्टात

Pune Tragedy: पुण्यातील भीषण अपघातात एमडी शिक्षण घेणाऱ्या डॉ. प्रशांत दासरवार यांचा मृत्यू

Pune Water Security: पुण्याच्या भविष्यातील पाणीसुरक्षेसाठी खडकवासला प्रकल्पातील धरणांतील गाळ काढण्यास संयुक्त समितीचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT