Miyawaki Project esakal
नाशिक

Miyawaki Project : महापालिकेच्या 6 शाळांमध्ये मियावाकी फॉरेस्ट प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिका, स्मार्ट स्कूल (Smart School) प्रकल्प सल्लागार पॅलेडियम कन्सल्टिंग कंपनी, रोटरी क्लब, सक्सेस ग्लोबल फाउंडेशनतर्फे महापालिकेच्या नऊ शाळांमध्ये

मियावाकी फॉरेस्ट (वन) प्रकल्प राबविला जात असून त्यातील सहा शाळांमध्ये प्रकल्प पूर्णत्वास आला आहे. (Miyawaki Forest Project is being implemented in 9 schools of Municipal Corporation nashik news)

एका शाळेत सहा असे एकूण सहा शाळांमध्ये एक हजार ४५२ वृक्षांचे वृक्षारोपण झाले आहे. संत गाडगेबाबा जयंतीचे औचित्य साधून प्रकल्प हस्तांतरण करण्यात आले. कार्यक्रमाला रोटरी क्लबचे माजी जिल्हाध्यक्ष दादा देशमुख, जिल्हा गव्हर्नर रमेश मेहेर, जिल्हा सचिव रणजित साळवे, अध्यक्ष एन्क्लेव्ह नाशिक सलीम बटाडा, सीमा पाचाडे, राहुल महाजन, हर्षद वाघ, अमित टेंभुर्णे आदी उपस्थित होते.

मुख्याध्यापिका छाया माळी यांनी प्रस्तावना केली. शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी मियावाकी फॉरेस्ट प्रकल्प तसेच, स्मार्ट स्कूल प्रकल्प याविषयी माहिती दिली. मियावाकी फॉरेस्ट प्रकल्पासाठी ठिबक सिंचन प्रणालीही उपलब्ध केली आहे.

प्रकल्पांतर्गत शाळेत सीता अशोक, जरूळ, बकुळ, नीम, मोहगिनी, करंज आदी विविध प्रकारच्या २४२ रोपांची लागवड केली आहे. शिक्षक प्रशांत पाटील यांनी सूत्रसंचालन तर शिक्षक अंकुश तळपे यांनी आभार मानले.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

‘मियावाकी’ची नवीन पद्धत

जपानमधील अकिरा मियावाकी या वनस्पती शास्त्रज्ञाने जंगल निर्मितीची नवी पद्धत विकसित केली. ही मानवनिर्मित जंगल पद्धती असून, यामध्ये परिसंस्था अभियांत्रिकेद्वारे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त देशी वृक्षांची तसेच, दुर्मिळ वृक्षांची योग्य अंतरावर लागवड केली जाते.

ज्यामध्ये कोणत्याही वृक्ष गटांचे वर्चस्व आढळत नाही. वृक्ष लागवडीत त्यांचे कूळ, जाती, प्रजातींची त्यांच्या अपापसातील अंतर आणि जमिनीखालून होणाऱ्या मूलद्रव्यांची देवाणघेवाण यास जास्त महत्त्व असते. हाच मुख्य फरक पारंपरिक वृक्ष लागवड आणि मियावाकी पद्धतीत आहे. वृक्ष आणि शालेय विद्यार्थी यांच्यामध्ये मैत्रीचा मजबूत धागा निर्माण होणे हा सध्याच्या वातावरणबदलावरचा प्रभावी उपाय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाम बोट दुर्घटनेत 15 भारतीयांचा मृत्यू; बोटीत असलेल्या 32 भारतीयांची नावं आली समोर

Pune News: कर्तव्य बजावणाऱ्या PSI ला दिलासा; पुण्यातील डेक्कन हॉटेल कारवाईप्रकरणी संदीप कदम यांचे निलंबन मागे

Karad Crime: कऱ्हाड शहर पोलिसांची दमदार कामगिरी! पिस्टल विक्रीस आलेल्या चौघांना अटक; चार देशी बनावटीचे पिस्टल, आठ जिवंत काडतुसे जप्त

MPSC Protest: विद्यार्थ्यांसोबत आजीही मैदानात! एमपीएससी आणि पोलिस भरतीसाठी संगमनेरमध्ये अनोखे आंदोलन, प्रांत कार्यालयासमोर ठिय्या

Ration Distribution: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्ट ते ऑक्टोबरचे तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी मिळणार; वितरणात मोठा बदल

SCROLL FOR NEXT