MKCL KLiC Course esakal
नाशिक

Nashik News: MKCLच्या ‘क्‍लिक’चा साक्षरतेतून सक्षमतेचा ध्यास : वीणा कामत

शंभर कोर्सेसचा प्रशिक्षणार्थींना लाभ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्र ज्ञान महामंडळामार्फत काळाची गरज ओळखून विविध विषयांतील कौशल्‍याधिष्ठित प्रशिक्षण उपलब्‍ध करून देण्यासाठी क्‍लिक हा शिक्षणक्रम उपलब्‍ध करून दिला आहे. या माध्यमातून साक्षरतेतून सक्षमतेचा ध्यास साधला जातो आहे.

शंभराहून अधिक विषयांतील कोर्सेस उपलब्‍ध असून, आत्तापर्यंत दहा लाख प्रशिक्षणार्थींनी यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केले असल्‍याची माहिती महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालिका वीणा कामत यांनी मंगळवारी (ता.५) दिली. (MKCL KLiC focus on empowerment through literacy Veena Kamat Nashik News)

एमकेसीएलतर्फे केंद्र प्रमुखांसाठी कॉलेज रोडवरील गोखले एज्‍युकेशन सोसायटी संस्‍थेच्‍या प्रांगणातील गुरुदक्षिणा सभागृहात मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयेाजन केले आहे.

यानिमित्त श्रीमती कामत यांनी पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. श्रीमती कामत म्‍हणाल्‍या, की अकाउंटिंग, सॉफ्टवेअर, डिझायनिंग अशा वेगवेगळ्या चौदा शाखांतील एकूण शंभराहून अधिक कोर्सेस उपलब्‍ध आहेत.

प्रत्‍येक कोर्ससाठी तीन महिने (१२० तास) प्रशिक्षण कालावधी आहे. यामध्ये वेगवेगळ्या टप्‍यांतून प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन उपलब्‍ध करून दिले जाते.

यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्‍या प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे प्रमाणपत्र तसेच यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाची गुणपत्रिका प्रदान केली जाते. तीन प्रशिक्षणक्रम पूर्ण केलेल्‍यांना पदविका स्‍तर प्रदान केला जातो आहे.

परदेशात ऑनलाइन परीक्षेची जबाबदारी

श्रीमती कामत म्‍हणाल्‍या, की एमकेसीएलद्वारे परदेशात आपल्‍या सेवा प्रदान केल्‍या जाता आहेत. १८० देशांमध्ये संस्‍थेचा विस्‍तार असून, यापैकी सौदी अरेबिया येथे सुमारे ५४ लाख विद्यार्थ्यांची दरवर्षी ऑनलाइन परीक्षा एमकेसीएलच्‍या यंत्रणेची सहाय्यतेने घेतली जाते आहे.

इजिप्तमध्ये विद्यापीठाच्‍या परीक्षेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन केले जाते आहे.

झारखंडमध्ये लवकरच सुरवात

महाराष्ट्रासोबत देशातील इतर राज्‍यांमध्ये प्रशिक्षण योजना राबविल्‍या जाता आहेत. यामध्ये बिहारच्‍या २० लाखाहून अधिक युवकांना इंग्रजी संभाषण, आयटी व सॉफ्टस्‍कीलचे प्रशिक्षण आत्तापर्यंत दिले आहे.

याशिवाय हरियाना, राजस्थान, ओरिसा या राज्‍यांमध्ये प्रशिक्षणक्रम उपलब्‍ध आहेत. झारखंडमध्येही लवकरच सुरवात केली जाणार असल्‍याचे त्‍यांनी नमूद केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT