टुडे ४ ॲंकर
NSK26H33731
जळगाव : आमदार चषक कबड्डी स्पर्धेतील विजेत्या संघासमवेत आमदार सुरेश भोळे, पांडुरंग काळे, ललित चौधरी, दीपक सूर्यवंशी, डॉ. प्रदीप तळवेलकर, विशाल सोनवणे आदी.
–––––
मुलांमध्ये क्रीडा रसिक, मुलींमध्ये जय बजरंग संघ विजेता
आमदार चषक कबड्डी स्पर्धा उत्साहात; जिल्ह्यातील ५५ संघांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २८ : जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे आयोजित आमदार सुरेश (राजूमामा) भोळे चषक ३६ वी किशोर- किशोरी कबड्डी स्पर्धा २३ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत पार पडली. यात मुलांमध्ये क्रीडा रसिक स्पोर्ट्स क्लब, तर मुलींमध्ये जय बजरंग संघ विजेता ठरला.
चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील मुलांचे व मुलींचे मिळून एकूण ५५ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेच्या अंतिम निकालात मुलांच्या गटात क्रीडा रसिक स्पोर्ट्स क्लब जळगाव तर मुलींच्या गटात जय बजरंग संघ कापूसवाडी यांनी प्रथम क्रमांक मिळवून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
स्पर्धेच्या समारोपप्रसंगी आमदार सुरेश भोळे, पांडुरंग (बंडूदादा) काळे, ललित चौधरी, दीपक सूर्यवंशी, डॉ. प्रदीप तळवेलकर, प्रकाश बालाणी, डॉ. वीरेंद्र खडके, निळू तायडे, अनिल अडकमोल, कल्पेश सोनवणे, महेश पाटील व महेश चौधरी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष श्याम कोगटा, उपाध्यक्ष महेश बुटी, कार्याध्यक्ष गिरीश नाईक, सहकार्यवाह नितीन बरडे, खजिनदार हरीश शेळके, सदस्य सुभाष मराठे, पंचप्रमुख अनिल कोळी तसेच निवड समिती सदस्य नयन सागरमनी, हितेश सोनी, सुनील राणे, क्रीडा रसिक मंडळाचे संघ प्रशिक्षक विशाल सोनवणे व संघ व्यवस्थापक मानस चौधरी उपस्थित होते.
चौकट
किशोर गट (मुले) विजेते संघ
प्रथम – क्रीडा रसिक स्पोर्ट्स क्लब, जळगाव, द्वितीय – स्वामी स्पोर्ट्स संघ, रावेर, तृतीय – कैलास क्रीडा मंडळ, जळगाव
---
किशोरी गट (मुली) विजेते संघ
प्रथम – जय बजरंग संघ, कापूसवाडी, द्वितीय – जय श्रीराम संघ, पहूर-पाळधी, तृतीय – क्रीडा रसिक स्पोर्ट्स क्लब, जळगाव.
––––––––
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.