मंजूर कामांमध्ये आदिवासी वस्तींसाठी पाणीपुरवठा योजना तसेच भूमिगत गटार बांधकामाला प्राधान्य दिले आहे.
सटाणा (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील २१ गावांसाठी राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत एक कोटी ५६ लाखांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार दिलीप बोरसे यांनी दिली. (MLA Dilip Borse said that 1.5 crore sanctioned for 21 villages in Baglan taluka)
आमदार बोरसे म्हणाले, की या योजनेंतर्गत तालुक्यातील ७८ गावांचे प्रस्ताव सादर केले होते. पहिल्या टप्प्यात २१ गावांच्या विविध विकासकामांसाठी मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी एक कोटी ५६ लाखांचा निधी मिळाला असून, त्यापैकी एक कोटी नऊ लाख रुपये संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. मंजूर कामांमध्ये आदिवासी वस्तींसाठी पाणीपुरवठा योजना तसेच भूमिगत गटार बांधकामाला प्राधान्य दिले आहे. तालुक्यातील लाडूद, कंधाणे, जामोटी (वडे दिगर), गोळवाड (भीमनगर), तिळवण (वाडीचौल्हेर), वटार, भाक्षी, महड, बहिराणे, राजापूरपांडे, साळवण (कोदमाळ), माळीवाडे (गणेशनगर), मळगाव (तिळवण) येथील आदिवासी वस्त्यांसाठी पाणीपुरवठा योजना, जलशुद्धीकरण युनिट, दुहेरी हातपंप मंजूर करण्यात आले आहेत. बाभुळणे येथे सौरदिवे घेण्यात आले, तर मळगाव खुर्द येथील सामाजिक सभागृह बांधकामाला मंजुरी देण्यात आली.
आदिवासी वस्त्यांमध्ये सांडपाण्याचे व्यवस्थापन होण्यासाठी भूमिगत गटार बांधकामाला प्राधान्य देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत पिंपळकोठे, दऱ्हाणे, कौतिकपाडा, नळकस, कठगड, गोळवाड (फुलेनगर) येथे भूमिगत गटार बांधकामाला मंजुरी देण्यात आली. या कामांमुळे स्वच्छ भारत अभियानाला मोठा हातभार लागणार आहे.
- दिलीप बोरसे, आमदार
(MLA Dilip Borse said that 1.5 crore sanctioned for 21 villages in Baglan taluka)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.