नाशिक : केरळमध्ये गर्भवती हत्तीच्या हत्येच्या घटनेमुळे देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली. भूकेने व्याकूळ झालेल्या गर्भवती हत्तिणीला अननसातून फटाके खायला घालून तिची क्रूर हत्या करण्यात आली. केरळमधील मल्लपूरम ही मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. सामान्य नागरिकांपासून ते खेळाडू, कलाकार आणि उद्योगपतींपर्यंत सर्वांना या घटनेवर हळहळ व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहेत्यावरुन देशभरात सोशल मिडीया तसेच अन्यत्र निर्माण झालेला राजकीय गदारोळ थांबण्याची चिन्हे नाहीत. अशातच येथील आमदारांनी आपल्या मतदारसंघातील नरभक्षक बिबट्याला ठार मारा, अशी मागणी करुन खळबळ उडवून दिली आहे.
आमदार सरोज अहिरे यांची मागणी
शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे नागरीक भयभीत आहेत. वन विभागाने या बिबट्याला त्वरीत जेरबंद करावे, अथवा त्याला ठार मारण्याचे आदेश द्यावेत, असे अहिरे यांनी या पत्रात म्हटले आहे या पत्रामुळे वनमंत्री असे आदेश देणार का? याची उत्सुकता आहे.
काय लिहलयं पत्रात आमदारांनी?
या संदर्भात आमदार सरोज अहिरे यांनी वनमंत्री संजय राठोड यांना पत्र लिहिले आहे. त्याची प्रत सर्व प्रसारमाध्यमांनाही पाठवली आहे. ''देवळाली मदारसंघातील नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात अनेक निष्पाप लहान मुले व नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग व शेती व्यवसाय आहे. त्यामुळे शेतकरी रात्री, पहाटे शेतात राबत असतात. मागील दोन महिन्यात हिंगणवेढे येथील कृणाल पगारे, दोनवाडे येथील रुद्र राजू शिरोळे ही लहान मुले तसेच नुकतेच जीवराम ठुबे या ज्येष्ठ नागरीकावर बिबट्याने हल्ला केला. त्यात ते ठार झाले. शेवगे दारणा येथील समृद्धी कासार या चार वर्षाच्या मुलीवर देखील हल्ला झाला होता. मात्र तिच्या आजीने प्रसंगावधान राखल्याने ती वाचली. शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे नागरीक भयभीत आहेत. वन विभागाने या बिबट्याला त्वरीत जेरबंद करावे, अथवा त्याला ठार मारण्याचे आदेश द्यावेत, असे अहिरे यांनी या पत्रात म्हटले आहे या पत्रामुळे वनमंत्री असे आदेश देणार का? याची उत्सुकता आहे. कारण असे झाल्यास असंख्य लोकप्रतिनिधी बिबट्यांबाबत हा 'सोपा' उपाय सुचवू शकतात.
हेही वाचा > अंधश्रध्देचा खेळ आणि राज्यस्तरीय रॅकेटचा पर्दाफाश..मुंबईतील पोलिस अधिकाऱ्यासह १९ जण सामील
त्यात नेमका तो बिबट्या शोधायचा कसा?
नाशिक जिल्ह्यात विशेषतः नाशिक लगतच्या नद्यांच्या परिसरात नाशिक, देवळाली, निफाड, सिन्नर, इगतपुरी या भागात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात संचार आहे. बिबट्यांचे प्रजनन अन्य मार्जारवर्गीय प्राण्यांच्या तुलनेत अधिक आहे. ते परिस्थितीशी जुळवून घेतात. त्यामुळे त्यांना मुबलक प्रमाणात लप ण्याची जागा उपलब्ध होते. त्यातून सह्याद्रीच्या परिसरातील हा भाग व जिल्ह्यात चारशेहून अधिक बिबटे असल्याचा वन विभागाचा अंदाज आहे. रोजच त्याबाबत तक्रारी येतात. वन विभागाने पिंजरा लावल्यावर पडकलेला बिबट्या अन्य भागातील दाट जंगलाच्या भागात सोडला जातो. मात्र, अंधार होताच नागरीकांना सावधगिरी बाळगावी लागते. निफाडच्या गोदाकाठला तर शेतकऱ्यांना बिबट्याची सवय झाली आहे. यावर पर्याय व उपाय शोधण्याची गरज आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींना पर्याय सुचवून राज्य सरकारला धोरण ठरविण्या भाग पाडला पाहिजे. तसे झालेले नाही. अशातच बिबट्याला ठार करा या मागणींने गोंधळ उडण्याची शक्यताच अधिक आहे. माणसांवर हल्ले झालेली गावे भिन्न आहेत. त्यात नेमका बिबट्या शोधायचा कसा? या संदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेते हा उत्सुकतेचा विषय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.