नाशिक

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आमदार राजूमामा भोळेंकडून २ लाखांचा धनादेश

CD
NSK26H31564 जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतनिधीचा धनादेश सुपूर्द करताना आमदार सुरेश भोळे. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आमदार भोळेंकडून दोन लाख सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : राज्यात दुष्काळाची परिस्थिती जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दोन लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. दुष्काळामुळे शेतकरी, शेतमजूर तसेच ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाच्या मदत योजनांसोबतच समाजातील सक्षम घटकांनीही सामाजिक बांधिलकीतून मदतीसाठी पुढे यावे, या भावनेतून हा निधी देण्यात आला. दुष्काळाच्या संकटात शासनासोबत समाजाचीही साथ आवश्यक आहे. आपल्या क्षमतेनुसार केलेली मदत गरजू कुटुंबांसाठी आधार ठरू शकते, असे आमदार भोळे यांनी सांगितले. जळगावसह राज्यातील उद्योजक, व्यापारी, दानशूर नागरिक, सामाजिक व सेवाभावी संस्था तसेच विविध क्षेत्रातील सक्षम व्यक्तींनी मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देऊन मदतीच्या कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. संकटाच्या काळात शासनाचा हात आणि समाजाची साथ एकत्र आल्यास अनेक कुटुंबांना सावरण्यास मदत होईल, असे आमदार भोळे यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers Constituency Election : शिवसेना भाजपमध्ये बंडखोरी, पुणे शिक्षक अर्ज दाखल; भाजपच्या कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात शिवसेनेचे चिवटे रिंगणात

Redevelopment Project : पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये; ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’च्या अहवालातील माहिती

PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

Marathi News Live Updates: राहुल गांधींचा आठ तासांपासून ठिय्या

Premanand Maharaj Ashram Death : प्रेमानंद महाराजांच्या आश्रमातील शिष्याच्या मृत्यूचे गूढ वाढले; मोबाईल, मानसिक स्थितीची पोलिसांकडून चौकशी

SCROLL FOR NEXT