MNC gets 2 Deputy Commissioners Assistant Commissioner post is vacant Nashik News esakal
नाशिक

मालेगाव महानगरपालिकेला लाभले दोन उपायुक्त; सहाय्यक आयुक्त पद रिक्तच

रावसाहेब उगले

मालेगाव (जि. नाशिक) : राज्य शासनाच्या (state government) नगरविकास विभागाने सोमवारी मुख्याधिकारी संवर्गातील गट ‘अ’ व गट ‘ब’ मधील राज्यातील ५३ अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली. या पदोन्नतीमुळे मालेगाव महानगरपालिकेला (MMC) दोन उपायुक्त नव्याने लाभले आहेत. महापालिकेत () सुमारे वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर शासन नियुक्त दोन उपायुक्त (Deputy Commissioner) नियुक्त झाल्याने कामकाजात सुसूत्रता येण्यास मदत होईल.

शहरात नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये पुणे महापालिकेचे (PMC) सहाय्यक आयुक्त (Assistant Commissioner) सुहास जगताप यांची पदोन्नतीने मालेगाव महापालिकेत उपायुक्तपदी नेमणूक झाली आहे. तळेगाव- दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनाही येथील महापालिकेत पदोन्नतीने (Promotion) उपायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या चार महिन्यांपूर्वीच महापालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून नेमणूक झालेल्या हेमलता डगळे यांची नागपूर महापालिकेत उपायुक्त पदावर पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. यामुळे शासननियुक्त दोन उपायुक्त लाभले असले तरी सहाय्यक आयुक्तांची दोन पदे मात्र अद्यापही रिक्त आहेत. सध्या महानगरपालिका कामाची धुरा प्रामुख्याने स्थानिक अधिकाऱ्यांवर आहे. बहुसंख्य अधिकाऱ्यांकडे कामाचा अतिरिक्त भार आहे. नवनियुक्त उपायुक्त पदभार केव्हा स्विकारणार याविषयी उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Washim News : 'तू खूप सुंदर दिसतो, तू खूप गोड आहे' म्हणत जवळ घेतलं अन्...; शिक्षकाकडून विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार

Smriti Mandhana Marriage : क्रिकेटर स्मृती मानधनाच्या विवाहस्थळी रुग्णवाहिका; एकाला उपचारासाठी रुग्णालयात हलवलं, नेमकं काय घडलं?

Periods & School Hygiene : आकस्मिक ‘पिरेडस्‌’ आणि तिची घालमेल, शाळांमध्ये सॅनिटरी पॅड असणे कितपत गरजेचं?

Latest Marathi News Live Update : भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात; शहाद्यात उद्या देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा

Nagpur: विज्ञान संस्कृती रुजविण्यासाठी नितीन गडकरींचा पुढाकार; विज्ञानाभिमुख कार्यासाठी संस्थेची स्थापना, ६० कोटींची तरतूद करणार

SCROLL FOR NEXT