MNS esakal
नाशिक

नाशिक : त्रिमूर्ती चौक उड्डाणपूल विरोधात मनसेची जनहित याचिका

, सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेकडून (NMC) त्रिमूर्ती चौक येथील प्रस्तावित उड्डाणपूल विरोधात भाजप (BJP) पाठोपाठ आता मनसेनेदेखील (MNS) जनहित याचिका दाखल केली आहे. उड्डाणपुलाचे काम बेकायदेशीर व अनियमित असल्याचा दावा करताना उड्डाणपुलाची खरोखरच आवश्‍यकता आहे का याची चाचपणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी याचिका दाखल केली आहे. मनसेकडून तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांना विरोधाचे निवेदन दिले होते. त्याचबरोबर पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनादेखील ऑक्टोबर २०२१ मध्ये निवेदन दिले. परंतु, निवेदनावर कुठल्याच प्रकारची कारवाई झाली नाही. नाशिककरांना न्याय मिळण्यासाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावल्याचा दावा दातीर यांनी केला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता व न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांनी जनहित याचिका दाखल करून घेतली.

उच्च न्यायालयाने उड्डाणपुलासाठी १६ डिसेंबर २०२० ला निविदा काढली. ११ मे २०२१ रोजी कार्यारंभ आदेश दिला. त्यात बेकायदेशीरपणा व अनियमितता आहे. त्यामुळे कार्यारंभ आदेश तत्काळ रद्द करण्याची मागणी करताना उड्डाणपुलाची खरोखरच गरज आहे का, हे तपासण्यासाठी तज्ञांची समिती नेमावी. तसेच, या जनहित याचिकेचा निर्णय होईपर्यंत उड्डाणपुलाच्या कामाला स्थगिती देवून नाशिककरांच्या कररूपी पैशातील ३०० कोटी रुपयांची अवाजवी उधळपट्टी थांबविण्याची मागणी करताना उड्डाणपुलाचे काम रद्द करावे, असे याचिकेत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT