MNS Google
नाशिक

नाशिक महापालिका निवडणुकीत मनसेचे लक्ष 'किंगमेकर' ठरण्यावर

विक्रांत मते

नाशिक : महापालिका निवडणुका जवळ येत असताना राजकीय पक्षाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. प्राथमिक टप्प्यात संघटना बळकटीवर लक्ष देत असताना मागील काळात सत्तेवर असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने किमान किंगमेकर ठरण्यासाठी दुसऱ्या, तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या उमेदवारांच्या प्रभागांवर लक्ष केंद्रित केले आहे. एक सदस्यीय प्रभाग झाल्यास मनसेला अधिक नगरसेवक निवडून येण्याची शक्यता वाटत असल्याने त्या दृष्टीने तयारी सुरू आहे.

सन २०१२ मध्ये महाराष्ट्रात मनसेच्या रूपाने प्रथमच नाशिक महापालिकेत सत्ता आली. पाच वर्षात सामाजिक दायित्वाच्या निधीतून अनेक प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर सन २०१७ च्या निवडणुकीला सामोरे जाताना मात्र नाशिककरांनी मोदी लाटेत सहभागी होण्याचा निर्णय घेत सत्तेचा सुकाणू भाजपच्या हाती दिला. सत्तेची साडे चार वर्षे उलटत असताना सन २०२२ च्या निवडणुकीचे वेध राजकीय पक्षांना लागले आहे. त्या दृष्टीने मनसेनेही तयारी सुरू केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे जुलै महिन्यात येऊन गेले, तर अमित ठाकरे दोन दिवस नाशिकमध्ये ठाण मांडून होते. नाशिकच्या मैदानावरील फुटबॉल व बॅडमिंटन हे त्यांचे खेळ चर्चेत आले. पुढील महापालिका निवडणुकीत भाजप सोबत युती होईल की नाही, याबाबत अद्याप निश्‍चित नसले तरी त्याचा विचार न करता संघटनात्मक बांधणी बरोबरच निवडणुकीची खेळपट्टी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामध्ये मागील निवडणुकीत दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवार व प्रभागांकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक पाच ब मधून नंदिनी बोडके, प्रभाग सहा ड मधून अशोक मुर्तडक, अकरा ब व क मधून योगेश शेवरे व सलीम शेख, तेरा क मधून ॲड. वैशाली भोसले निवडून आले. या पाच प्रभागांव्यतिरिक्त मतदानाचा टक्का वाढविणाऱ्या प्रभाग केंद्रित करण्यात आले आहे.

किंगमेकर ठरण्याची आशा

सन २०१७ च्या निवडणुकीत दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या मनसेच्या नगरसेवकांमध्ये पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक पाचमध्ये उल्हास धनवटे, प्रभाग क्रमांक ६ अ मध्ये चित्रा जगन्नाथ तांदळे, प्रभाग क्रमांक ६ क मध्ये छाया काकड, प्रभाग क्रमांक १० ब मध्ये कलावती इंद्रभान साळवे, प्रभाग क्रमांक १० ड मध्ये अशोक शंकर नागरे, प्रभाग क्रमांक २५ ड मध्ये अनिल मटाले, प्रभाग क्रमांक २७ अ मध्ये प्रशांत खरात, प्रभाग क्रमांक ३० अ मध्ये नचिकेत धाकराव हे दुसऱ्या स्थानावर होते. पाच उमेदवारांचा दुसरा क्रमांक दोनशे ते अडीचशे मतांनी हुकला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत उतरताना या भागांकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT