Amit Thackeray Sakal
नाशिक

मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात झाली अमित ठाकरेंची सभा

कधी ट्रेनमधून प्रवास, तर कधी फुटबॉल खेळल्याने अमित ठाकरे चांगलेच चर्चेत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

अमित ठाकरे सध्या विविध भागांचे दौरे करत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या महासंपर्क दौऱ्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. कधी ट्रेनमधून प्रवास, तर कधी फुटबॉल खेळल्याने अमित ठाकरे चांगलेच चर्चेत आहेत. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.

अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. तिथल्या देवळाली कॅम्प इथं पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू होती. या बैठकीदरम्यान, अनेक वेळा लाईट गेली. पण अमित ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात आपली बैठक सुरूच ठेवली. मनसेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.

राज्यातल्या बदलत्या राजकीय समीकरणाचा फायदा घेण्यासाठी आता मनसे चांगलीच सक्रिय झाली आहे. शिवसेनेतल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर मनसेने आता संघटनात्मक पातळीवर आपली बाजू बळकट करण्यासाठी अमित ठाकरेंना मैदानात उतरवलं आहे. मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे महासंपर्क अभियानांतर्गत राज्यभर दौरे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET 2027: पुढच्या वर्षीच्या नीट परीक्षेत होणार 'हे' बदल! वर्षातून अनेकवेळा परीक्षा होण्याची शक्यता

Pankaja Munde : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांसमोर आक्रोश, सरकार शेतकरी-पशु पालकांच्या पाठीशी

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Alegaon Murum Mining: आळेगाव पागा मुरूम उत्खनन प्रकरण: पंचनाम्यातील आकडे संशयास्पद, पर्यावरणप्रेमींची सखोल चौकशीची मागणी

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात श्राद्धाचं जेवण कसं असावं? शास्त्रानुसार काय वाढावं आणि काय टाळावं जाणून घ्या

SCROLL FOR NEXT