A fire broke out in the sheets of paper in the private market, and the battery exploded while charging the mobile phone and caught fire esakal
नाशिक

Nashik News : चार्जिंग सुरू असताना मोबाईलचा स्फोट; खासगी मार्केटमधील पत्र्यांच्या गाळ्यांना आग

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : औरंगाबाद रोडलगत निलगिरी बागेजवळील परफेक्ट कृषी डाळिंब मार्केट या खासगी व्यावसायिक पत्र्यांच्या गाळ्यांना मंगळवारी (ता. २५) मोबाईल चार्जिंग करताना बॅटरीचा स्फोट होऊन आग लागली.

या आगीत मार्केटमधील ७ गाळ्यांतील फळांच्या पॅकिंगचे साहित्य व पत्रे जळून खाक झाले. आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, लाखो रुपयांचे पॅकिंग साहित्य जळल्याने मोठे नुकसान झाले आहे. (Mobile phone explodes while charging Fire to shops in private market at panchavati Nashik News)

या खासगी मार्केटच्या मुख्य कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या गाळ्यांमध्ये हा स्फोट झाला. या गाळ्यांमध्ये प्रामुख्याने प्लॉस्टिकचे क्रेट, रद्दी पेपर, पुठ्ठ्याचे बॉक्स, गवत आदी साहित्य असल्याने त्यांनी त्वरीत पेट घेतला.

त्याची झळ एकाच रांगेत असलेल्या सात गाळ्यांना पोहचली. विद्युत दिवे, ट्युबलाईट, वायर्स जळाल्या. अग्निशामक दलास कळविण्यात येताच तीन बंबांच्या साह्याने आग विझविण्यात यश आले.

यातील काही गाळे बंद असल्यामुळे जेसीबीच्या साह्याने गाळ्यातील साहित्य बाहेर काढण्यात आले. पत्रे तोडून आतील आग विझवून पुढील भागातील गाळ्यांना झळ पोहचणार नाही, याची दक्षता घेण्यात आली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

आग विझविल्यानंतर गाळ्यांच्या मागील भागात प्लॉस्टिक क्रेटचा लगदा होऊन अनेक क्रेट एकमेकांना चिकटले होते. गाळ्यांच्या पुढील भागातील क्रेट जळून फरशीवर थर जमा झाला होता. पुठ्ठ्यांचे अर्धवट जळालेले बॉक्स पडून होते.

गवताच्या गड्ड्या आवारात फेकण्यात आल्या होत्या, त्यातील काहींना आगीची झळ बसली. त्यांनी पेट घेऊन नये म्हणून त्यावर पाणी मारण्यात आले. आगीत सात गाळ्यांच्या पत्र्यांनी पेट घेतल्याने त्यांचे नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT