Nashik crime news esakal
नाशिक

मोबाईल हिसकावला; संशयित दुचाकी सोडून पसार

नरेश हाळणोर

नाशिक : आडगाव परिसरातील समर्थनगर येथे बस स्टॉपवर थांबलेल्या व्यक्तीचा हातातील मोबाईल हिसकावून पोबारा करणाऱ्या दुचाकीस्वाराचा (Bike) पाठलाग केला. या वेळी संशयितांची दुचाकी स्लीप होऊन पडल्यामुळे ते पसार झाले. (mobile phone stolen suspect left bike and ran away nashik crime Latest Marathi News)

याप्रकरणी आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन खरे (रा. स्वामी समर्थनगर, आडगाव) यांच्या फिर्यादीनुसार, ते मंगळवारी (ता. १९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास समर्थनगर बसस्टॉपवर मित्राची वाट पाहत थांबलेले होते. त्या वेळी त्यांच्या हातात १० हजार रुपये किमतीचा मोबाईल होता.

त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून अमृतधामच्या दिशेने पोबारा केला. त्या वेळी खरे यांनी आरडाओरडा केला असता, काही नागरिकांनी संशयितांचा पाठलाग सुरू केला.

काही अंतरावर संशयितांची दुचाकी (एमएच- १५- डीए- ७६५) स्लीप होऊन ते पडले. परंतु, संशयितांनी तेथून पलायन केले. याप्रकरणी आडगाव पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Silver Price in India : 3 लाखांच्या चांदीसमोर सर्व काही फिके! अवघ्या 1 वर्षात चांदी तिप्पट; तेजीमागे आहेत ही 'धक्कादायक' कारणे

'मला पुरुषांची गरज फक्त बेडवरच आहे', लग्नाबाबत तब्बूच वादग्रस्त विधान? सोशल मीडियावर रंगली चर्चा

Latest Marathi News Live Update : नाशिकमधल्या पिंपळगाव मोर इथं चारचाकी आयशर ट्रक स्लिप

Akola Crime : अकोल्यात जुन्या वादातून दोन गटात हाणामारी; मोठी उमरी परिसरात तणाव; चौघांवर गुन्हा!

Silver Rate Today : चांदीच्या किंमतीने रचला नवा इतिहास! दरामध्ये इतका मोठा बदल

SCROLL FOR NEXT