नाशिक

Nashik Crime : मोबाईल चोर ताब्यात; पंचवटी गुन्हे शोध पथकाची कामगिरी

प्रतीक जोशी

Nashik Crime : मोबाईल चोरट्यास ताब्यात घेण्यास पंचवटी गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे. या संशयिताकडून चार चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.

या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक मालसाने करीत आहेत. (Mobile thief arrested by police nashik crime news)

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरातील मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.

त्याअनुषंगाने मोबाईल चोरांचा शोध घेत असतांना पंचवटी गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित केदार व कर्मचारी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मोबाईल चोरी करणारा एक संशयित गंगाघाट येथे येणार असल्याचे समजले.

त्यानुसार सापळा रचून गोदाघाट परिसरातून संशयित ओम सचिन पलबळकर (वय १९ वर्ष, नवदुर्गा चाळ, नवनाथ नगर, पेठ रोड, नाशिक) ताब्यात घेतले. या संशयिताने पंचवटी पोलिस ठाणे हद्दीत मोबाईल चोरी केले असल्याची कबुली दिली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याचे कडून एक समसुंग,दोन रिअल मी, एक वीवो कंपनीचा मोबाईल असे चार मोबाईल एकुण अठ्ठेचाळीस हजार रुपयांचे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदरची कामगिरी पोलिस अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पंचवटी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव, सहा. पोलीस आयुक्त, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) बगाडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित केदार, मिथुन परदेशी, सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक काकड पोलिस हवालदार सागर कुलकर्णी, पोलिस नाईक दिपक नाईक, कैलास शिंदे,महेश नांदुर्डीकर, निलेश भोईर,राकेश शिंदे, पोलिस अंमलदार विष्णु जाधव,संतोष पवार, गोरक्ष साबळे, महाले नितीन पवार, श्रीकांत कर्पे,कैलास वाकचौरे यांनी पार पाडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway Ticket Transfer Rules : रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! ऐनवेळी प्रवास रद्द झाल्यास तिकीट वाया जाणार नाही; घरच्यांच्या नावावर करता येणार ट्रान्स्फर, वाचा नियम

Kolhapur Water Pumping Ban : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! भोगावती आणि पंचगंगा नदीकाठावर 'या' दिवशी राहणार उपसाबंदी; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द

Dharashiv News: डोळ्यादेखत बस जळून खाक; चालकाच्या एका निर्णयाने वाचले १५ जीव!

Latest Marathi News Live Update : करवीरला दुष्काळी यादीतून वगळल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; आमदार चंद्रदीप नरके यांचा इशारा

Congress Organizational Reshuffle : काँग्रेसमध्ये संघटनात्मक मोठे फेरबदल; महाराष्ट्रातील चार नेत्यांना संधी; ८१ सचिवांच्या नियुक्त्या जाहीर

SCROLL FOR NEXT