Arresting the militants in the railway station waiting room esakal
नाशिक

Mock Drill: इगतपुरी रेल्वेस्थानकात अतिरेकी घुसतात तेव्हा...; नागरिकांमध्ये उडाली प्रचंड खळबळ

मॉकड्रिल असल्याचे समजल्यावर सोडला सुटकेचा निःश्वास

सकाळ वृत्तसेवा

Mock Drill : रेल्वे स्थानकात व बाहेरील मुख्य गेटवर अचानक लोहमार्ग पोलिस, सुरक्षा बलाचे जवान, बॉम्बशोध पथक, पोलिस पथकाची धावपळ सुरू झाली. शहरातील जुना मुंबई-आग्रा महामार्ग सील करत रेल्वेस्थानकात पथकाने धाव घेतली.

अचानक झालेल्या या सर्व झालेल्या प्रकारामुळे रेल्वे प्रवासी, मुख्य गेटवर उभे असलेले प्रवासी व रस्त्यावर उभे असलेल्या नागरिकांमधे एकच घबराट पसरली होती. मात्र हा पोलिसांचा मॉकड्रिल असल्याचे समजल्यावर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. (Mock Drill terrorists enter Igatpuri railway station nashik)

अतिरेक्यांना पकडून नेताना पोलिस पथक व मॉकड्रीलमधे सहभागी झालेले पोलिस अधिकारी व पोलिसपथक.

या प्रकारामुळे मात्र मोठा गोंधळ उडाला होता. मंगळवारी (ता. ११) सकाळी अकराच्या सुमारास रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर असलेल्या प्रतिक्षालयात दोन चेहरा झाकलेल्या संशयितांनी काही प्रवासी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना बंदिस्त करून ठेवल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना प्लॅटफॉर्म तीनवरील प्रवाशांनी दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन बनकर व रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस निरीक्षक राकेशकुमार, पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजू सुर्वे, सहायक निरीक्षक सोपान राखोंडे व त्यांच्या पथकाने धाव घेऊन रेल्वे बुकिंग कार्यालय, मुख्य प्रवेशद्वार समोरील जुना मुंबई आग्रा महामार्ग बंद करण्यात येऊन सर्व परिसर निर्मनुष्य करून सील करण्यात आला.

रेल्वे प्रबंधक प्रेमकुमार आर्या, पोलिस अधिकारी व अंमलदार, रेल्वे सुरक्षा बलाचे पथक, पोलिस ठाण्याचे अधिकारी, नाशिक ग्रामीणचे डॉग युनिट व त्यांचा बॉम्ब फाइंडर डॉग ॲना, बॉम्बशोध पथक, नाशिक शहर पोलिस पथक, एटीएस, क्यूआरटी, नाशिक ग्रामीणचे पोलिस अधिकारी व पथके हजर होते.

नगरपरिषदेचे अग्निशमन दल, ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टरांचे पथक व रुग्णवाहिका त्वरित घटनास्थळी हजर होत संयुक्त कारवाई केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एकूण आठ अधिकारी व चाळीस अंमलदार यांनी प्रत्यक्ष दहशतवादी घातपात हल्ला विरोधी मोहिमेच्या मॉकड्रीलमध्ये सहभाग घेतला. नाशिक ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक सुभाष भामरे यांना माहिती मिळताच तेही इगतपुरी पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह तत्काळ रेल्वे स्थानकावर पोचले होते.

त्यानंतर सर्वांनी मिळून दहशतवाद विरोधी कारवाई करत प्रतिक्षालयात बंदिस्त करून ठेवलेल्या प्रवासी आणि खाद्य पदार्थ विक्रेते यांची सुटका करत संशयितांना ताब्यात घेऊन त्यांना लोहमार्ग पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

दहशतवादी हल्ल्याप्रसंगी करायच्या कारवाईची ही रंगीत तालीम असल्याचे समजल्यावर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT