फोटो : H35130
श्रवणीय मोहनवीणा वादनाची रसिकांवर मोहिनी
मासिक संगीत सभेत साक्षी शेवलीकर यांचे वादन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : गिटारसारख्या पाश्चिमात्य वाद्याला भारतीय शास्त्रीय संगीताच्या अंगाने जुळवून घेत पद्मभूषण पं. विश्वमोहन भट्ट यांनी मोहनवीणा वाद्य जगासमोर आणले. याच वाद्यावर भोपाळच्या तरुण वादक साक्षी शेवलीकर यांच्या श्रवणीय सुरेल मोहनवीणा वादनाने रसिकांवर मोहिनी घातली.
गुरूवर्य पं. शंकरराव वैरागकर संगीत प्रतिष्ठान आयोजित ‘स्वरसाधना’ उपक्रमाची ७६वी मासिक संगीत सभा सारडा कन्या विद्यामंदिरात शनिवारी (ता. १४) झाली. सुरवातीला गुरुवर्य पंडित शंकरराव वैरागकर, सुधा वैरागकर, श्रीकांत कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. साक्षी यांनी वादनाची सुरुवात राग यमनने केली. सुरुवातीला आलाप, जोड त्यानंतर विलंबित तीनतालात गत सादर करत त्यांनी मैफील रंगवली. राग बागेश्रीत झपतालात गत सादर करून मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. तबला वादक कल्याण पांडे यांनी समर्पक साथसंगत केली. याप्रसंगी ज्येष्ठ गायिका मृदुला देव, सहज देव, मोहन उपासनी, प्रसाद गोखले आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक ओंकार वैरागकर यांनी केले. सरिता वैरागकर यांनी आभार मानले.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.