Molestation esakal
नाशिक

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा

नरेश हाळणोर

नाशिक : जिल्ह्यातील सिन्नर येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या (Minor Girl) विनयभंग (Molestation) प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी व १२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. स्वप्निल विलास लोणारे (रा. विजयनगर, सिन्नर) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Molestation of minor girl accused was sentenced to hard labor Nashik Crime News)

पीडितेच्या फिर्यादीनुसार, १३ सप्टेंबर २०१७ रोजी सिन्नर शहर परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या घरात आरोपी स्वप्निल लपून बसला होता. पीडित मुलगी घरात आल्यानंतर आरोपीने तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोस्कोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक आर.बी. लोखंडे यांनी तपास करीत, जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. त्यानुसार, जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश डी.डी. देशमुख यांच्यासमोर खटला चालला. यावेळी सरकारी पक्षातर्फे ॲड. दीपशिखा भिडे यांनी युक्तिवाद करीत सहा साक्षीदार तपासले व पुरावे सादर केले. त्यानुसार न्यायधीशांनी आरोपी स्वप्निल लोणारे यास तीन वर्षे सक्तमजुरी व १२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

SCROLL FOR NEXT