woman molest by car driver
woman molest by car driver esakal
नाशिक

Nashik Crime News : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग; कारचालकाला अटक

नरेश हाळणोर

नाशिक : लासलगावला जाण्यासाठी थांबलेल्या पीडितेने नांदूर नाका येथून एका कारमधून लिफ्ट घेतली असता, संशयित कारचालकाने महिलेचा विनयभंग केला. माडसांगवी टोलनाक्याजवळ पीडितेने आरडाओरडा केल्याने तेथील जागरुक नागरिकांच्या मदतीने तिची सुटका झाली. याप्रकरणी आडगाव पोलिसात संशयित कारचालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यास अटक करण्यात आली आहे. सदरील घटना गेल्या गुरुवारी (ता.१३) रात्री घडली. (molesting woman on pretext of giving lift Car driver arrested Nashik Latest Crime News)

प्रवीण शिवाजी पेखळे (40, रा. सर्व्हिस स्टेशन, माडसांगवी, नाशिक) असे संशयित कारचालकाचे नाव आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, गेल्या गुरुवारी (ता.१३) त्या लासलगावी मामाच्या गावाला जाण्यासाठी औरंगाबाद रोडवरील नांदूर नाका येथे वाहनाची वाट पाहत थांबलेल्या होत्या. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास संशयित पेखळे कारमधून (एमएच 04 जीझेड 8709) सायखेडा चौफुलीच्या दिशेने जात असताना, पीडितेने लिफ्टसाठी हात दाखविला. त्याने कार थांबवून लिफ्टसाठी पीडितेला कारमध्ये बसविले.

मात्र, त्याने पीडितेशी गैरवर्तन करुन अश्लिल हावभाव करत विनयभंग केला. गैरवर्तन केल्यानंतर पेखळे याने पीडितेला बलात्कार करण्याची धमकीही दिली. त्यानंतर तिने टोलनाक्यावर गाडीचा वेग कमी होताच आरडाओरडा केला. यावेळी टोल नाक्यावरील कर्मचारी पीडितेच्या मदतीसाठी धावून आले.

तरीही संशयिताने पीडितेला जबरदस्तीने गाडीत ओढून घेतले. त्यानंतर आडगाव पोलिसांनीही तत्परता दाखवत घटनास्थळ गाठले. संशयिताने पोलिसांनाही शिवीगाळ केली. याप्रकरणी संशयिताविरोधात आडगाव पोलिसात विनयभंगासह पोलिसांना शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास पोलिसांनी अटक केली असून आडगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अरुण पाटील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT