Villagers perform funeral rites on a monkey according to Hindu culture esakal
नाशिक

Monkey Funeral : टेहरे ग्रामस्थांकडून माकडावर अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव (जि. नाशिक) : टेहरे (ता. मालेगाव) येथे झाडावरून पडल्याने माकडाचे निधन झाले. गेल्या तीन महिन्यापासून माकड गावात राहत होते. शनिवारी (ता.१८) सकाळी हिंदू रितीरिवाजानुसार मयत माकडावर अंत्यविधी करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Monkey funeral by Tehre villagers nashik news)

टेहरे गावात लंगूर जातीचे माकड तीन महिन्यापासून राहत होते. शुक्रवारी रात्री (ता.१७) वीजेच्या कडकडाटासह पाऊस पडत असल्याने हा माकड सोमेश्‍वर मंदिराजवळील चिंचेच्या झाडावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

माकडाचा गावात मृत्यू झाल्याने त्याचा अंत्यविधी व उत्तरकार्याचा कार्यक्रम करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. ग्रामस्थांनी एखाद्या व्यक्तीप्रमाणे हिंदू धर्मातील प्रथेनुसार माकडावर अंतिम संस्कार केले.

माकडाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. तीन महिन्यापासून राहत असलेल्या माकडाशी गावकऱ्यांची मैत्री झाली होती. माकडाने या काळात लहान मुले, महिला व ग्रामस्थांना कुठलाही त्रास दिला नाही. गावातील सर्व नागरिकांनी पैसे गोळा करून माकडावर अंतिम संस्कार केला.

अंत्यविधीच्या मिरवणुकीत अख्खा गाव जमा झाला होता. तत्पूर्वी माकडाची पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जावेद खाटीक यांनी तपासणी केली. माकड वयोवृद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. ३० मार्चला माकडाचा तेरावे तसेच उत्तरकार्याचा कार्यक्रम ग्रामस्थांनी ठेवला असल्याची माहिती रवींद्र शेवाळे यांनी दिली.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रशांत शेवाळे, पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण पाटील, चंद्रकांत शेवाळे, दिनेश शेवाळे, पोलिस पाटील नीलेश पाटील, तसेच वन विभागाचे वनरक्षक योगेश पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

माकडाचा पुतळा बसवणार

टेहरे येथील माकडाच्या चितेस गावातील तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रशांत शेवाळे यांनी अग्निडाग दिला. ग्रामस्थ १३ दिवस दुखवटा पाळणार आहेत. अंत्यविधी झालेल्या जागेवर माकडाचा पुतळा बसविणार असल्याचे पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra government : 'देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री तर चंद्रशेखर बावनकुळेंची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार?'; संजय राऊतांचा मोठा दावा

Nagpur: वाघाला पकडण्यासाठी दोघांचा थेट पिंजऱ्यात मुक्काम; कुही जवळील वेलतूरच्या जंगलात रंगला थरार

Latest Marathi News Live Update : लष्कर परिसरातील फलटण मशिदीसमोर १८ वर्षीय तरुणास पाच ते सहा जणांनी केली बेदम मारहाण

Panchgani Case : दारूच्या नशेत घरात डोकावला अन्...; इंदापूरच्या पर्यटकाचा पाचगणीत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत खून; 4 जणांना 14 जुलैपर्यंत पोलिस कोठडी

RSS Belagavi Meeting : 'आरएसएस'च्या बैठकीनंतरच साहित्यिक कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य, नव्या वादाला फुटलं तोंड

SCROLL FOR NEXT