rain esakal
नाशिक

नाशिकमध्ये वरुणराजाची जोरदार हजेरी

महेंद्र महाजन

नाशिक : मॉन्सूनचे वेळापत्रक बिघडल्याने मागील महिन्यात इगतपुरी आणि त्र्यंबकेश्‍वरमध्ये महिन्याच्या सरासरी पावसाच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. आज (ता.१) सकाळी संपलेल्या चोवीस तासात इगतपुरी तालुक्यात १३.३, तर त्र्यंबकेश्‍वरमध्ये ८.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच आज नाशिक शहर आणि परिसरात वरुणराजाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहरवासीयांनी पडत्या पावसात कामे करावी लागली.

कळवण, सिन्नर, चांदवड तालुक्यात मात्र २४ तासात पावसाची नोंद झाली नाही. आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये असा : मालेगाव-०.८, बागलाण-५.४, नांदगाव-०.७, सुरगाणा आणि नाशिक- प्रत्येकी ०.६, दिंडोरी-०.४, पेठ-१.२, निफाड-१.९, येवला-०.३, देवळा-२.१. सध्याच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्यांना सुरवात केली आहे. पण तरीही विशेषतः भाताची रोपे टाकण्यासाठी आदिवासी भागात आणखी पावसाची आवश्‍यकता आहे.

आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात ५.६, नाशिक जिल्ह्यात ३.३, धुळ्यात २, नंदुरबारमध्ये ४.१, जळगावमध्ये ०.९ मिलिमीटर पाऊस झाला. कोकण विभागात ६२, नाशिक विभागात १.९, पुणे विभागात ७, औरंगाबाद विभागात ७.२, अमरावती विभागात ११.८, नागपूर विभागात १२.१ मिलिमीटर पावसाची २४ तासात नोंद झाली आहे.

धरणांमध्ये २३ टक्के जलसाठा

धरण समूह जलसाठा टक्के

गंगापूर २२

पालखेड १२

ओझरखेड २०

दारणा २१

गिरणा खोरे ३१

पूनंद १७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update News : मान्सूनला अचानक ब्रेक ‘अल निनो’चा प्रभाव वाढला; शेतकऱ्यांसह सामान्य चिंतेत, राज्यात पाऊस पुन्हा कधी सक्रिय होणार?

Failed Student Scheme : नापास विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा दिलासा! जूनमध्ये अपयश आल्यास डिसेंबरमध्ये मिळणार आणखी एक संधी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ११ जुलै २०२६ ते १७ जुलै २०२६ - मराठी राशी भविष्य

UP : मुख्यमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या नियमांत बदल; अॅसिड हल्ल्यातील पीडितांचाही समावेश, अर्ज कसा करायचा?

निवडणूक कार्यक्रम जाहीर! सोलापूर बार असोसिएशनसाठी 4 ऑगस्टला मतदान; वकिलांना अर्ज घ्यायला अन्‌ भरायला 2 दिवसांची मुदत, ‘हे’ आहेत निवडणुकीसाठी इच्छुक

SCROLL FOR NEXT